अस्ताव्यस्त पार्किंग
सातारा : शहरातील जिल्हा परिषद परिसरामध्ये अस्ताव्यस्त वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूक कोेंडी निर्माण होत आहे. या ठिकाणी रिक्षा चालकांकडून रिक्षा थांबविल्या जात असून, परिणामी मुख्य चौकात वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी व सायंकाळी चौकात वाहतूक कोंडी होत असते.
उन्हाचा तडाखा वाढला
म्हसवड : उन्हाळा ऋतूला सुरुवात झाली असल्याने वातावरणात उन्हाचा तडाखा वाढत आहे. शहरात ठिकठिकाणी रस्त्याकडेला थंडगार लिंबू सरबत, कोकम सरबत तसेच उसाच्या रसाची मागणी वाढली आहे. उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून नागरिक सरबत पित आहेत.
उन्हाळ्याचे विकार वाढले
उंब्रज : दिवसेंदिवस सर्वत्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे मोेठ्या व्यक्तींसह लहान मुलांना उन्हाळी विकार त्रासदायक ठरू लागले आहेत. डोकेदुखी, पित्त, कानदुखी, घामोळे आदी उन्हाळी ऋतूतील आजार वाढत आहेत.
..................