म्हसवड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पालिकेने चौदाव्या वित्त आयोग निधीतून एक्सरे मशीन व पालिका हद्दीतील नागरिकांसाठी लस खरेदी करावी, अशी मागणी आम्ही म्हसवडकर ग्रुपने केली आहे. या मागणीचे निवेदन ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना दिले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही तरूणांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या माध्यमातून ५ ऑगस्ट २०२० पासून म्हसवड शहरात लोकवर्गणीतून म्हसवड डीसीएचसी पंधरा ऑक्सिजन बेडसह बारा आयसोलेशन असे २७ बेडचे कोरोना हॉस्पिटल सुरू आहे. या हॉस्पिटलमधून सर्वसामान्य गोरगरीब चारशे ते पाचशे गंभीर रुग्ण बरे झाले आहेत. सध्या या डीसीएचसी कोरोना हॉस्पिटलसाठी एक्सरे मशीनची मोठी गरज असून, या हॉस्पिटलला ही एक्सरे मशीन नगरपालिकेच्या चौदाव्या वित्त आयोग फंडातून मिळावी. तसेच म्हसवड शहरातील नागरिकांसाठी लस खरेदी करून सर्वांचे लसीकरण व्हावे, यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर आम्ही म्हसवडकर ग्रुपचे सदस्य युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, डॉ. राजेंद्र मोडासे, एल. के. सरतापे, राहुल मंगरूळे, संजय टाकणे, डॉ. राजेश शहा, प्रशांत दोशी, प्रीतम तिवाटणे आदींच्या सह्या आहेत.
===Photopath===
280521\img-20210528-wa0057.jpg
===Caption===
म्हसवड पालिकेने 14व्या वित्त आयोग फंडातून एक्सरे मशीन व पालिका हद्दीतील नागरिकांसाठी लस खरेदी करावी अशी मागणी आम्ही म्हसवडकर ग्रुपने केली आहे