रहिमतपूर : शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना नियमित करावी, यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी प्राध्यापक अनिल बोधे यांनी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्हानिहाय शिक्षक व शिक्षकेतर संघटना यांच्या शिक्षणाधिकारी यांच्यासोबत तिमाही व विशेष बैठका लावून शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या परंतु मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान व केंद्राच्या धर्तीवर जुन्या पेन्शनचा लाभ घ्यावा, डीसीपीएस योजनेतील कर्मचाऱ्यांना एनपीएस योजनेत खाते उघडण्यासाठी सक्ती करू नये, ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत सर्व शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करून चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळवून द्यावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
२१रहितमपूर निवेदन
फोटो : शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार जयंत आसगावकर यांना प्राध्यापक अनिल बोधे यांच्या हस्ते देण्यात आले.