खटाव : खटावमधील ग्रामपंचायत इमारतीच्या अगदी जवळच असलेला विद्युत लोखंडी खांब धोकादायक स्थितीत उभा आहे. हा खांब तळातूनच पूर्ण तुटल्यामुळे कधीही मोठा अनर्थ घडू शकतो. या खांबावरून अनेक घरांना विद्युत कनेक्शन दिलेले आहे. तर चालू कनेक्शन असल्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
सध्या हा खांब इतक्या धोकादायक स्थितीत उभा आहे की, जरी वाहनाचा धक्का बसला किंवा जोराचे वारे आले तरी जवळच असलेल्या ग्रामपंचायत इमारतीवर किंवा शेजारी असलेल्या पिठाच्या गिरणीवर तसेच राहत्या इमारतीवर पडण्याची दाट शक्यता असून, मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. नेहमी गजबजलेल्या ग्रामपंचायतीच्या चौकात हा विद्युत खांब धोकादायक स्थितीत उभा असल्याने तसेच वाहनांची ये-जा सुरू असते. विद्युत प्रवाह चालू असल्यामुळे मोठा अनर्थ होण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेता, तो तेथून तत्काळ हटवून त्या ठिकाणी नवीन खांब बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
२६खटाव
कॅप्शन : खटाव ग्रामपंचायतीच्या चौकात असलेला विद्युत खांब धोकादायक स्थितीत उभा असल्याने कधीही तो पडून मोठा अनर्थ घडू शकतो.