आदर्की : सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथील रस्त्याला व वाहनाला अडथळा ठरत असलेले
जुनाट वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की फाटा ते फलटण
दरम्यान संस्थान काळात आंबा, चिंच, वड, पिंपरण आदी वृक्षांची लागवड केली होती. ती झाडे जुनी व
धोकादायक झाली आहेत. अशी धोकादायक झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने ठेकेदार काढतात; पण ठेकेदार फायद्याची ठरणारी झाडे काढतात, अशी लिंबाची झाडे व फांद्या काढल्या आहेत. आदर्की बुद्रुक येथे पिंपरण व वडाची अशी दोन
वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत. वडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने उंच ट्रक व उसाच्या ट्रॉली
फांदीला घासतात, तर एकावेळी दोन वाहने झाडाखाली आल्यास वाहनास फांद्या धडकतात. तरी
अपघात होण्याअगोदर संबंधित विभागाने धोकादायक वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.