सातारा : ‘दिवंगत अभयसिंंहराजे भोसले यांनी अजिंंक्य उद्योग समूहाची निर्मिती करुन सातारा तालुक्यात सहकारक्रांती केली. अजिंक्यतारा सूतगिरणी उभारून उत्तमरीतीने चालविण्याचे भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न सभासदांच्या सहकार्याने साकारले आहे. अजिंक्यताराच्या सुताला देशभरात मागणी आहे,’ अशी माहिती अजिंक्य उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. वळसे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर सूतगिरणीच्या २५ व्या वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे चेअरमन रामचंद्र बाळकृष्ण जगताप होते. यावेळी गिरणीचे उपाध्यक्ष हणमंतराव देवरे, सर्व संचालक, अजिंंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रामभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, जितेंद्र सावंत, किशोर ठोकळे, सातारा मार्केट कमिटीचे सभापती अॅड. विक्रम पवार, नगरसेवक प्रवीण पाटील, अजिंक्यतारा सहकारी बँकेचे चेअरमनङ्कविलासराव घोरपडे, व्हाईस चेअरमन देवदत्त राजमाने उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले, ‘सुधारित प्रकल्प अहवालानुसार गिरणीला राज्य शासनाकडून उर्वरीत १०५ लाखांचे भागभांडवल लवकरच मिळणार आहे. त्यातून आणखी २४०० चात्या उभारून १२ हजार चात्यांपर्यंत गिरणीची विस्तारवाढ करण्याचे नियोजन आहे. गिरणीच्या कामकाजात स्थानिक कामगारांचा मोलाचा वाटा आहे, त्यांना गिरणीने प्रशिक्षण तसेच वेळोवेळी पगारवाढ, सानुग्रह अनुदान, विमा संरक्षण आदी सुविधाही दिल्या आहेत. चात्यांच्या विस्तारवाढीनंतर आणखी बेरोजगार युवक व महिलांना गिरणीतङ्करोजगार उपलब्ध होणार आहे.’ ‘अजिंंक्यतारा सूतगिरणीने २०१४-१५ या वर्षात उत्कृष्ट आर्थिक व तांत्रिक कार्यक्षमता सिध्द केली आहे. या वर्षात २३ कोटी ४८ लाख रुपये किमतीच्या सुताची विक्री केलेली आहे. सुताचा दर्जा नेहमीच उच्चप्रतीचा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गिरणीचे सूत परदेशी निर्यात करण्यात आले, ही बाब सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची आहे. सूत उत्पादन चालू झाल्यापासून गिरणीस सलग दुसऱ्या वर्षी ‘अ’ आॅडिट वर्ग मिळाला आहे,’ असेही आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी सांगितले.आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गिरणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक दत्तात्रय मोरे, अजिंक्य बझारचे चेअरमन यशवंतराव साळुंखे, संचालक प्रकाश नाईक, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अॅड. सूर्यकांत धनवडे, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत घोरपडे, अनंता वाघमारे, सर्जेराव सावंत, सुरेशराव कदम, जयसिंग कणसे, रामङ्कपवार, मनोहर घाडगे, माजी संचालक संपतराव जाधव, दिलीप फडतरे, थोराजी ढाणे, अशोकराव मोरे, जिहेचे माजी सरपंच जयवंतराव फडतरे, गोवे सोसायटीचे माजी चेअरमन भानुदास चवरे, विनोद जाधव, अजिंक्य बझारचे प्रमोद जाधव, बी. एस. जाधव, डॉ. शशिकांत साळुंखे, अकबर शेख, गजानन दळवी, सुनील काटे, गुलाबराव पाटील, जनार्दन जाधव-गोवे उपस्थित होते. संचालक उत्तमराव नावडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सवलतीत वीज देण्याची गरजवीज व कापूस दरवाढ व त्यामानाने सुतास योग्य दर मिळत नसल्याने तसेच उत्पादन खर्चातील वाढीमुळे अनेक गिरण्या अडचणीत आल्या आहेत. यावर राज्य शासनाने किमान सवलतीच्या दरात गिरण्यांना वीजपुरवठा करून त्वरित उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. सहकारी सूतगिरण्यांना शाश्वत व रास्त दरात कापूस उपलब्धता, सूतदरावर नियंत्रण व वीजदरात सवलत मिळाल्यास सूतगिरणी देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देईल. त्यामुळे यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
साताऱ्याच्या सुताला परदेशातही मागणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2015 10:01 PM