पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार सुरू करण्यासाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सद्यस्थिती पाहता सर्व उद्योगधंदे सरकारने सुरू केले आहेत; परंतु ज्यांचे हातावरचे पोट आहे, असे छोटे-मोठे आठवडा बाजार करून जगणारे गोरगरीब नागरिक सध्या मोठ्या हाल अपेष्टा सोसत आहेत, यांचे जगणे मुश्कील झाले आहे. अशा गोरगरीब लोकांसाठी राजवंश आठवडा बाजार संघटनेतर्फे खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आठवडे बाजार पूर्ववत सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राजवंश आठवडा बाजार संघटनेचे अध्यक्ष जयवंत पवार, उपाध्यक्ष मुकुंदराज काकडे, सचिव अर्जुन आवटे, खजिनदार गणेश कुर्ले, संचालक आण्णा कांबळे, सुनील निदान, जालिंदर शिंदे, सोमनाथ भूते, चंद्रकांत कासार, उज्ज्वला मतकर, मंगेश जाधव, विनोद सज्जन, सनी शिवदास, पुरुषोत्तम खांडेकर, शिवाजी पवार, विनोद पवार, अजय कुर्ले, इमरान आतार, प्रसाद कालेकर, विशाल क्षीरसागर, सौरभ तांबोळी, सुनीता पांचाळ, सविता राऊत, अंजना निकम, हे राजवंश आठवडा बाजार संघटनेचे पदाधिकारी व सभासद सदस्य उपस्थित होते.