जिंती : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात अकरा महिन्यांपासून आठवडे बाजार कोरोना संसर्गजन्य रोगामुळे राज्य शासनाने बंद ठेवले होते. ग्रामीण भागातील काही ठिकाणचे आठवडी बाजार बंद आहेत. काही ठिकाणी सुरू ठेवले आहेत. जिंती येथे आठवडी बाजार सुरू करावा, अशी मागणी कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे प्रवक्ते प्रसाद रणवरे यांनी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्याकडे केली.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी माल गावातील आठवडी बाजारात विक्रीसाठी घेऊन येत असतात. गावातील बाजार बंद असल्याने शेतातील पालेभाज्या मार्केटमध्ये भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गामधून नाराजी होत आहे; परंतु सध्या ग्रामीण भागातील काही ठिकाणी आठवडी बाजार अजूनही बंद आहेत. काही भागांत आठवडी बाजार सुरू आहे. ग्रामपंचायत पातळीवर निर्णय घेत नसल्यामुळे कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे प्रवक्ते प्रसाद रणवरे यांनी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना निवेदन दिले.
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे प्रवक्ते प्रसाद रणवरे, अनिकेत रणवरे, ऋषीराज रणवरे, गिरीश रणवरे, रोहित रणवरे उपस्थित होते.