शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
2
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: ...तर जबाबदारी माझी; हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी निकालापूर्वी केले स्पष्ट
3
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
4
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
5
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
6
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
7
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
8
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
9
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
10
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
11
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान
12
निवडणूक आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार? महायुतीतील ३ पक्षांमध्ये होईना नावावर एकमत
13
निवडणुकीचे फड रंगले, वातावरण तापले; तासगावात आजी-माजी खासदार भिडले 
14
शिंदे समितीचा अहवाल सादर, धनगड दाखले रद्द; धनगर आंदोलनाला बळकटी देणाऱ्या घटना
15
मुंबईत परवडणाऱ्या घरांची निर्मिती अशक्य, ५० टक्के रक्कम जाते सरकारी तिजोरीत!
16
भुयारी मेट्रोतून १५ हजार मुंबईकरांचा प्रवास; पहिल्याच दिवशी झाली झोकात सुरुवात
17
चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार
18
अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले ‘नोबेल’पात्र; व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड
19
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
20
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका

लोकशाहीचा हुकमी एक्का; मतदानाचा वाढवा टक्का !

By admin | Published: February 20, 2017 11:43 PM

विविध उपाययोजना : भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनोखे फंडे राबविले. क्यू आर कोडच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी मतदानाचे केलेले आवाहनही अनोखे ठरले. तसेच काही शाळांनीही यासाठी पुढाकार घेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संकल्पना मांडल्या आहेत. जिल्ह्यात १९ लाख ६६ हजार ५८४ मतदार आहेत. या मतदारांनी भयमुक्त वातावरणात व उत्स्फू र्तपणे मतदान करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर २४ तास आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला. निवडणूक कालावधीत राजकीय पक्षांमार्फत पैसे, मद्य, मोफत वस्तू यांचे वाटप यावर अंकुश ठेवण्यासाठी ३८ व्हिडिओ सर्व्हिलियन्स पथके, ३७ स्टॅटिस्टिक सर्व्हिलियन्स पथके, ३७ फ्लार्इंग स्कॉड पथके अशी एकूण ११२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंगबाबत ६६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. माण तालुक्यात १ व खंडाळा तालुक्यामध्ये २ हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपद्रवक्षम गावांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. परवानाधारक लोकांकडील शस्त्रे जमा करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. जिल्ह्यामध्ये एकूण १९० मतदान केंद्र असून, सर्व संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदान कर्मचारी मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर पोहोचविणे व आणणेकामी एसटी बस, जीप, टेम्पो, ट्रक, लाँच, मिनीबस, क्रूझर अशा एकूण ६४२ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाभरात एकूण २ हजार ५८४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, १ हजार ८४८ इमारती यासाठी घेण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर १६ हजार ९८२ कर्मचारीक्षेत्रिय अधिकारी, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई असे एकूण १६ हजार ९८२ मतदान कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस उपअधीक्षक दर्जाचे १६ अधिकारी, ५१ पोलिस निरीक्षक, ११९ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, ३ हजार ४७५ पोलिस कर्मचारी, ७५० गृहरक्षक दलाचे जवान यांचा सहभाग असणार आहे. (प्रतिनिधी) मतदान करा, रेखाचित्रातून आवाहनयेथील औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सिनर्जी नॅचरल स्कूलने आपल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेच्या मागील बाजूस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सातारा यांच्या वतीने मतदार जनजागृतीबाबतचे रेखाचित्र प्रसिद्ध करून शासनाच्या विधायक कामात आपला सहभाग नोंदविला. हे इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.