सातारा : लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्यावतीने गुरुवारी भाजपला तोडीस तोड असे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर मित्र पक्षांच्यावतीने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दीपक पवार या दोघांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आघाडीच्यावतीने भव्य शक्तिप्रदर्शन करण्यात आले.साताऱ्यातील गांधी मैदानावर असंख्य कार्यकर्ते जमा झाले होते. श्रीनिवास पाटील आणि दीपक पवार या दोघा उमेदवारांनी गोल बागेतील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर राजवाड्यावरील अजिंक्य गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर भव्य रॅलीला सुरुवात झाली.या रॅलीमध्ये आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रदेश सरचिटणीस पार्थ पोळके यांची प्रमुख उपस्थिती होती.राजवाडा येथून माणदेशी ढोल-पथकाच्या गजरात ही रॅली निघाली होती. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती पाहायला मिळाली. मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना प्रचंड बंदोबस्त ठेवावा लागला.
Maharashtra Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचेही तोडीस तोड शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 2:09 PM
लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्यावतीने गुरुवारी भाजपला तोडीस तोड असे शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचेही तोडीस तोड शक्तिप्रदर्शनश्रीनिवास पाटील, दीपक पवार यांच्या रॅलीमध्ये प्रचंड गर्दी