शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

Satara: श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 1:31 PM

श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २९वे वर्ष

पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने दि. ८ ते १८ रोजीदरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपाहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय केली आहे. या दिंडीत पुसेगाव व पंचक्रोशीतील अधिकाधिक वारकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव व विश्वस्तांनी केले.श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २९वे वर्ष आहे. सोमवार, दि. ८ रोजी सकाळी ७:३० वाजता श्री सेवागिरी महाराज पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. सोमवार, दि. ८ रोजी महिमानगड, मंगळवार, दि. ९ रोजी लोधवडे, बुधवार, दि. १० रोजी म्हसवड, गुरुवार, दि. ११ रोजी पिलीव, शुक्रवार, दि. १२ रोजी तांदूळवाडी, शनिवार, दि. १३ रोजी भाळवणी, रविवार, दि. १४ रोजी उपरी, सोमवार, दि. १५ रोजी वाखरी, मंगळवार, दि. १६ रोजी पंढरपूर मुक्कामी पोहोचेल. बुधवार, दि. १७ रोजी चंद्रभागेत स्नान करून नगरप्रदक्षिणा होईल. गुरुवार, दि. १८ रोजी चंद्रभागा स्नान करून दुपारी एकनंतर दिंडी तीर्थक्षेत्र पुसेगावकडे ट्रकमधून प्रस्थान करील.ट्रस्टमार्फत दिंडीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचा अपघाती विमा उतरवला जाईल. सर्व मुक्कामांच्या ठिकाणी निवाऱ्यासाठी अतिरिक्त तंबूंची सोय केली आहे. पंढरपूर येथील मुक्कामात वारकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सोयीसुविधांनी युक्त प्रशस्त निवाऱ्याची सोय ट्रस्टमार्फत केली आहे. दिंडी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022