आॅनलाईन लोकमतपुसेगाव (जि. सातारा), दि. २७ : ग्यानबा तुकाराम व विठ्ठलनामाचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या गजर आणि भगवी पतका खांद्यावर घेऊन श्री सेवागिरी महाराजांच्या पुसेगाव-पंढरपूर पायी पालखी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. ग्रामस्थांनी सकाळी ९ वाजता भावपूर्ण वातावरणात वारकऱ्यांना निरोप दिला. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज ट्रस्टतर्फे याहीवर्षी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी पालखी, श्री सेवागिरी महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे, सेवागिरी महाराजांच्या पादुकांचे व पालखी दिंडी रथाचे विधीवत पूजन केले. यावेळी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, रणधीर जाधव, योगेश देशमुख, सुरेश जाधव, प्रताप जाधव, चेअरमन सुनिलशेठ जाधव, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ?ॅड. विजयराव जाधव, गुलाबराव वाघ, दिलीप बाचल, बाळासाहेब जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.श्री सेवागिरी मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर पायी दिंडी सोहळ्यातील फुलांच्या माळांनी सजविलेला दिंडी रथ पुसेगाव बाजारपेठेतून बसस्थानकातील शिवाजी चौकात आला. यावेळी रस्त्यांच्या दुर्तफा उभ्या असलेल्या भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी मनोभावे पालखी रथाचे व प्रतिमेचे दर्शन घेतले. शिवाजी चौकात वारकऱ्यांनी ज्ञानोबा-तुकाराम महाराज, श्री सेवागिरी महाराजांचा जयघोष, अभंगच्या तालावर वारकरी भक्तिरसाच्या वातावरणात न्हाऊन गेले होते.छत्रपती शिवाजी चौकात वारकऱ्यांच्या फुगड्या, गोलरिंगण, पारंपारिक खेळ सादर केले. पुसेगावसह परिसरातील पवारवाडी, वर्धनगड, फडतरवाडी, नेर, विसापूर, काटकरवाडी, कटगुण, खातगुण, बुध आदि भागातील हजारो वारकरी ग्रामस्थांनी पुसेगाव नगरिक हजेरी लावली.
श्री सेवागिरी महाराज दिंडी सोहळ्याचे प्रस्थान
By admin | Published: June 27, 2017 1:18 PM