शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

मायणीत विद्यार्थ्यांचे उपोषण

By admin | Published: January 24, 2017 12:49 AM

९५ जणांचा निकाल अधांतरी : महाविद्यालयाने दंड भरण्याची मागणी

सातारा : खटाव तालुक्यातील मायणी येथील मेडिकल कॉलेजने प्रवेशावेळी खोटी माहिती देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून शासनाचा दंड भरण्यासहीे टाळाटाळ केल्याने सप्टेंबर २०१५ मध्ये परीक्षा दिलेल्या ९५ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.याबाबत माहिती अशी की, मायणी येथील इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स रिसर्च (आयएमएसआर)मध्ये सन २०१४-१५ मध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दंडापोटी महाविद्यालयाने शासनाकडे वीस कोटींचा दंड भरावा, यासाठी महाविद्यालय प्रांगणात ९५ विद्यार्थ्यांसह पालकांनी बुधवार, दि. १८ पासून उपोषण सुरू आहे. ९५ विद्यार्थ्यांचा प्रवेश नियमबाह्यप्रकरणी मुंबईच्या प्रवेश नियंत्रण समितीने महाविद्यालय प्रशासनास जबाबदार धरून प्रती विद्यार्थी वीस लाखांचा दंड आकारला.हा दंड महाविद्यालयाने न भरल्याने विद्यार्थी न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन सरकारी वकिलामार्फत विद्यार्थी अन्य महाविद्यालयात सामावून घेण्याबाबत माहिती दिली. न्यायालयाने सरकार पाठिंबा देतोय म्हणून प्राधिकरणाने आकारलेला दंड शासनाने भरून महाविद्यालयाकडून नंतर वसूल करावे, असे आदेश दिले. शासनाने हा दंड न्यायालयात भरला आहे.आता महाविद्यालय प्रशासन हा दंड शासनास भरण्यास टाळाटाळ करत आहे. परंतु सप्टेंबर २०१५ मध्ये परीक्षा दिलेल्या ९५ विद्यार्थ्यांचा निकाल अजूनही राखून ठेवला आहे. शासनाने या विद्यार्थांचा निकाल जाहीर करून त्यांना अन्य महाविद्यालयात सामावून घेऊन त्यांचे भवितव्य वाचवावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)