शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
2
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
3
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
4
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
5
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
6
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
7
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
8
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
9
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
10
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
11
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
12
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
13
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
14
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
15
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
16
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
17
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
18
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
19
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
20
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?

अजित पवारांनाही तलवार, वाघनखं देणार : उदयनराजे

By सचिन काकडे | Published: July 14, 2023 5:29 PM

मंत्रिपद कोणाला मिळेल हे मी नाही सांगू शकत

सातारा : 'भाजप नेत्यांना मी तलवार आणि वाघनख भेट देत आहे, याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये. असे असते तर जेव्हा मी राष्ट्रवादी पक्ष सोडला तेव्हाच तलवार, वाघनखं भेट दिले असते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी अभिनंदन केले असून, लवकरच त्यांना देखील तलवार आणि वाघनख भेट देणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.सातारा शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून, कास धरण ते सातारा सुमारे २७ किलोमीटर लांब नवीन जलवाहिनीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी या कामाचे उद्घाटन खा. उदयनराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. या जिल्ह्याने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याला जर मंत्रीपद मिळालं तर जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल. परंतु मंत्रिपद कोणाला मिळेल हे मी नाही सांगू शकत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाबाबत छेडले असता ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच या बंडाबाबत विश्लेषण केले आहे. त्यामुळे जे त्यांचं मत आहे तेच माझंही आहे. भाजप नेत्यांना मी तलवार आणि वाघ नख भेट देत आहे, यामागे दुसरे कोणतेही कारण नाही. तलवार, वाघनख आम्ही भेट नाही द्यायची तर कोणी द्यायची? सातारा जिल्हा बँकेचे संचालक अभ्यास दौऱ्यासाठी युरोपात गेले आहेत. याबाबत प्रश्न विचारतात उदयनराजे म्हणाले, आज तंत्रज्ञान कितीतरी पुढे गेलेले आहे. आपल्याला घरबसल्या संगणकावर, मोबाईलवर देखील बरीच माहिती मिळू शकते. कास परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी राज्याबरोबरच केंद्र शासनाकडे सक्षमपणे पाठपुरावा करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेAjit Pawarअजित पवार