पेट्री : कास पठार परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेला गव्हनर्मेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर ग्रुप, कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रोटरी क्लब उद्योगनगरी पिंपरी यांनी अडीच लाख रुपये किमतीची वस्तुरूपाने शैक्षणिक मदत केली.
शाळेची भौगोलिक स्थिती तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही शाळेकडून वेळोवेळी राबवण्यात आलेल्या उपक्रमाची दखल घेऊन येथील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही तंत्रज्ञान तसेच शैक्षणिक अडचण निर्माण होऊ नये यासाठी शाळेस मोठ्या प्रमाणावर मदत करत कुसुंबीमुरा प्राथमिक शाळेस पाच संगणक, दोन एलईडी स्क्रीन तसेच पहिली ते सातवीच्या अभ्यासक्रमाचे सॉफ्टवेअर, प्रोजेक्टर अशा शैक्षणिक वस्तू भेट दिल्या.
यावेळी रघुनाथ सुतार, सचिन कुलकर्णी, योगेश देशपांडे, प्रशांत सरदेसाई, रविकिरण केसरकर, रमेश सातव, गटशिक्षणाधिकारी कल्पना तोडरमल, विस्ताराधिकारी चंद्रकांत कर्णे, केंद्रप्रमुख विजय देशमुख, अशोक मनुकर, उदय शिंदे, शामराव जुनघरे, मुख्याध्यापक विनायक चोरट, रत्नाकर भिलारे, जालंदर सुतार, बाळकृष्ण जाधव उपस्थित होते. नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले, तर लक्ष्मण आखाडे यांनी आभार मानले.
कोट
दुर्गम भागातील शाळा असूनही अडीच लाखांचा वस्तुरूपाने शैक्षणिक उठाव करणे नक्कीच कौतुकास्पद आहे. गतवर्षी क्रीडा स्पर्धेतही शाळेने भरीव कामगिरी केली. दुर्गम भागातील इतर शाळांनाही रोटरीक्लबने मदत करावी.
- कल्पना तोडरमल, गटशिक्षणाधिकारी, जावळी