शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

तोतया पोलीस अधिकाऱ्याला पिस्तुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 6:18 PM

सातारा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या गणेश वाईकर या तरुणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गणेश वाईकर याने सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देतोतया पोलीस अधिकाऱ्याला पिस्तुलासह अटकपुणे पोलिसांची कारवाई : सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र जप्त

सातारा : सातारा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या गणेश वाईकर या तरुणाला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गणेश वाईकर याने सातारा पोलिसांचे बनावट ओळखपत्र तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.गणेश गोपीनाथ वाईकर हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कार्ला या ठिकाणी राहात आहे. त्याने सातारा जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र तयार केले असून, त्याच्याजवळ बेकायदा पिस्तूल असल्याची माहितीही लोणावळा पोलिसांना मिळाली.

त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गणेश वाईकर याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्याच्याजवळ बनावट ओळखपत्र तसेच बेकायदा पिस्तूल सापडले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सातारा पोलीस दलाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे समोर आले.दरम्यान, गणेश वाईकरवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बनावट शासकीय ओळखपत्र बाळगणे तसेच आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वाईकर याने सातारा पोलीस दलातील अधिकाऱ्याचे बनावट ओळखपत्र बाळगल्यामुळे सातारा पोलीसही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर