सातारा : गेल्या चोवीस तासांपासून परळी खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी मध्यरात्री सज्जनगड रस्तावर दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाण्याचा रस्ता बंद झाल्याने वाहतूक खोळंबली होती. अनेक पर्यटक व भक्तांना साडेतीन किलोमीटरचा घाट रस्ता चालून जावे लागले. मंगळवारी सायंकाळी सातारा तालुका पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दरड काढून रस्ता मोकळा करण्यात आला.
गेल्या चोवीस तासांपासून राज्यासह सातारा जिल्'ात संततधार पाऊस सुरू आहे. सातारा तालुक्यातील डोंगरात परळी खोºयात भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सज्जनगड घाटात दरड कोसळली. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. रात्री उशिरा व सकाळी सज्जनगडवर जाणाºया-येणाºया भाविकांसाठी मोठी अडचणी झाली. दुचाकीचालक त्या रस्त्यातून वाट काढत होते.
चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्याने अनेकांनी आपली वाहने दरड पडलेल्या ठिकाणाहून अलीकडे वाहने थांबवून पायी जात होते. एसटी बस तर भातखळे फाटा परिसरातून वळवण्यात आली. त्यामुळे अनेक भाविक व रहिवाशांना गडावर जाण्यासाठी साडेतीन किलोमीटरची पायपीट करावी लागली. परजिल्'तून आलेल्या भाविकांनी आपली वाहने अर्ध्या रस्त्यातून मागे फिरवली. सध्या ठोसेघर, कास परिसरात पर्यटकांची संख्या वाढत असल्याने ते पर्यटक जाता-जाता सज्जनगडला भेट देत असताना रस्त्यात दरड पडल्याने अनेकांना गडावर जात न आल्याने अनेकांची निराशा झाली. सातारा तालुका पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तब्बल १८ तासांनंतर दरड हटवून रस्ता मोकळा केला. सायंकाळी रस्ता मोकळा झाल्यानंतर गडावरील वाहतूक सुरळीत झाली.