शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

गटकोट संवर्धनाचा वाईतील तरुणांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 12:35 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.

ठळक मुद्देभटकंती सह्याद्रीची ग्रुपचा उपक्रम अनेक ठिकाणी स्वच्छता करून जपला इतिहास

पांडुरंग भिलारे वाई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या वाई भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. किल्ले पांडवगड, वंदनगड, वैराटगड, केंजळगड, कमळगड हे छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आजही साक्ष देत आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले-गडकोटांची काळाच्या ओघात दुरवस्था होत आहे. याची जाण असल्याने भटकंती सह्याद्रीची या ग्रुपच्या तरुणांनी परिसरातील किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेतला आहे.यामध्ये वाई शहरासह तालुक्यातील युवक सहभागी आहेत. सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या संवर्धन मोहिमेत पांडवगड, केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, चंदनवंदन गड अनेकवेळा श्रमदान करून संवर्धन केले.भटकंती ग्रुपचा प्रतिनिधी सौरभ जाधव म्हणाले, किल्ल्यावरील ढासलेल्या तटबंदी, ढासळलेले बुरुज, वाढलेली झाडीझुडपे, किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. तेच गडकिल्ले कोणत्या अवस्थेत आहेत बघा. त्या काळात गडकोटांनी रक्षा केली आता त्यांचे जतन करण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक माणसाला प्रेरणा देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन केल्यास पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे.आता प्रत्येकाला प्रश्न निर्माण होईल की, आपण नक्की गड किल्ल्यांची रक्षा कशी करायची तर आपण सर्वांनी एकत्र येऊन जिथे-जिथे ज्या-ज्या संस्था गड-किल्ले संवर्धनाचे काम करत आहेत. त्यांच्यावर संवर्धनाचे काम करणे. तसेच आपण गड-किल्ले फिरायला जातो, तिथे कचरा दिसला की गोळा करणे आवश्यक आहे.वाई परिसरातील सर्वच किल्ल्यांवर संवर्धन चळवळ सुरू आहे. वंदनगडला शिवंदनेश्वर प्रतिष्ठान असेल, किल्ले कमळगडला गोरक्षनाथ प्रतिष्ठान, किल्ले केंजळगडला भटकंती सह्याद्रीची परिवार यासाठी झटत आहे. या मोहिमेत सौरभ जाधव, रोहित मुंगसे, अनिल वाशिवले, अजय वाशिवले, शुभम चव्हाण, शंकर कांबळे, प्रवीण कदम, प्रमोद कदम यांच्यासह अनेक युवक भाग घेत असतात.गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नसह्याद्रीमध्ये असलेले किल्ले हे महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी प्रेरणास्थान असून, येणाऱ्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत. त्यांचे संवर्धन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. तरी या मोहिमेत युवकांनी सहभागी व्हावे, असे मत भटकंती सह्याद्रीच्या सदस्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :FortगडSatara areaसातारा परिसर