शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

‘टाऊन प्लॅनिंग’प्रमाणेच मलकापूरचा विकास

By admin | Published: July 09, 2015 10:45 PM

एकमताने ठराव : कलम ३० चा नकाशाच कायम करण्याचा निर्णय; एकमताने शासनाकडे पाठपूरावा

सातारा : सत्ता गेल्यानंतर नैराश्येच्या खाईत लोटल्या गेलेल्या काँगे्रस व राष्ट्रवादीने आता पुन्हा कंबर कसली आहे. भाजप-शिवसेनेच्या शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत तसेच शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात दोन्ही पक्ष शुक्रवारी (दि. १0) रस्त्यावर उतरणार आहेत. दोन्ही पक्षांचा उद्देश एकच असला तरी आंदोलनाचे मार्ग वेगवेगळे आहेत. यानिमित्ताने साताऱ्यात दोन्ही पक्षांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. यात कोण बाजी मारतो, हेच पाहण्याजोगे ठरणार आहे.युती शासनाच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादीने ज्या दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, नेमक्या त्याच दिवसाचा मुहूर्त काँगे्रसनेही साधला आहे. युती शासनाने दूध दरातील केलेली कपात, साखर निर्यातीवर घातलेली बंदी, सातारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लांबवलेला विषय, गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आदी विषय या दोन्ही पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या अजेंड्यावर आहेत. शासनाचा निषेध करण्याचा मुख्य उद्देश दोन्ही काँगे्रसचा आहे. पण जनतेच्या मनात असणारा असंतोष दोन्ही पक्षांनी एकत्रित येवून बाहेर काढला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता. पण स्वतंत्रपणे मोर्चे काढून हे आंदोलन होणार आहे. राष्ट्रवादीने तर पुणे-बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची किनार आहे. आगामी काळातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही या दोन्ही काँगे्रस समोरसमोर असणार आहे. त्यामुळे शक्तिप्रदर्शनाद्वारे आपली ताकद दाखवून देण्याची संधी दोघांनीही साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता या शक्तिप्रदर्शनात कोण बाजी मारतो, हे पाहण्याजोगे ठरणार आहे. साहजिकच दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँगे्रसने दोन माजी मुख्यमंत्र्यांकडे मोर्चाचे नेतृत्व दिले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते या मोर्चाला यावेत, याची तयारीही केली आहे. काँगे्रस कमिटीपासून साडेदहा वाजता हा मोर्चा निघणार आहे. तसेच राष्ट्रवादीने तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून २00 गाड्यांचे नियोजन केले आहे. राष्ट्रवादी कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी) पोलिसांवरील ताण वाढणार...दोन्ही काँगे्रसच्या मोर्चाची वेळ जवळपास सारखीच असल्याने पोवईनाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. साहजिकच पोलिसांवरील ताण वाढणार आहे. तसेच या परिसरातील वाहतूकही कोलमडणार आहे.