शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

श्रमसंस्कारातून गावाचा विकास : पाटील

By admin | Published: February 13, 2015 12:07 AM

पार्ले गावामध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने विविध महाविद्यालयांची शिबिरे आयोजित करण्यात आली. ही बाब आदर्शवत

कऱ्हाड : ‘श्रमाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून होत असते. परंतु अशी शिबिरे आपल्या गावामध्ये घेण्यासाठी अनेक गावांचा नकारात्मक दृष्टिकोन असल्याचे दिसून येत आहे. पार्ले गावामध्ये गेली अनेक वर्षे सातत्याने विविध महाविद्यालयांची शिबिरे आयोजित करण्यात आली. ही बाब आदर्शवत असून, गावाच्या विकासासाठी उभारणी देणारी व कौतुकास्पद आहेत,’ असे गौरावेद्गार पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील काढले.पार्ले, ता. कऱ्हाड येथे डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिर समारोपप्रसंगी ते बोलत होते. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे, पार्लेचे माजी सरपंच राहुल पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सरपंच राजेंद्र नलवडे-पाटील, प्राचार्य डॉ. अजय देशमुख, उपप्राचार्य प्रा. हणमंत कुंभार, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. अयुब कच्छी, जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार व विद्यार्थी मंडळ सचिव रणजित निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य अजय देशमुख, ऋतुजा जाधव व महेश साळवी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अयुब कच्छी यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी अबुबकर सुतार यांनी आभार मानले. सुरेंद्र रजपूत, ऋतुजा जाधव व रोहित सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मिनल निजसुरे व शीतल जक्कनवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोसायटीचे माजी अध्यक्ष संपतराव नलवडे, विजय खापे, राहुल शिवदास, प्रशांत पाटील, विजय पाटील, संतोष जाधव, अशोक माने, सुहास नलवडे, महादेव पाटील, अभिजित नलवडे, इंद्रजित नलवडे, सुधीर काशीद उपस्थित होते. (प्रतिनिधी)