वाई : पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यांचे परमभक्त आनंदशेठ फणसे यांनी लाखो भक्तांसाठी सेवागिरी महाराजांची महिमा स्वरबद्ध करण्याचा संकल्प केला. त्यांनी ‘सेवागिरी भक्ती संगीत’ कंपनीमार्फत श्री सेवागिरी महाराजांचे मंत्र, आरती रेकॉर्डिंग करून नुकतेच प्रसारित केले आहे.
आनंदशेठ फणसे यांनी तयार केलेली अभंगरचना स्वरबद्द करण्यात आली. अभंगांचे रेकॉर्डिंग आजीवासन साउंड्स, मुंबई येथे नितीन कायरकर यांच्याहस्ते श्री सेवागिरी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. याहीपुढे आशा भोसले, अलका याग्निक या गायिकासुद्धा भजन, अभंग गाणार आहेत, अशी माहिती आनंदशेठ फणसे यांनी दिली.
संकल्पच्या शुभारंभप्रसंगी महंत मठाधिपती सुंदरगिरी महाराज , देवस्थान ट्रस्ट पुसेगाव अध्यक्ष मोहन जाधव, बाळासाहेब जाधव, बाळकृष्ण जाधव, लीला फणसे इत्यादी उपस्थित होते. रेकॉर्डिंगचे काम दोन दिवस सुरू होते. यावेळी गायक सुरेश वाडकर, गायिका, साधना सरगम, म्यझिक डायरेक्टर नितीन कायरकर व सहकारी उपस्थित होते. गुढीपाडव्यादिवशी नवीन अभंग गायक सुरेश वाडकर यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला. (वा.प्र)
फोटो : २२ पांडुरंग भिलारे
मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्याहस्ते गायक सुरेश वाडकर यांचा सत्कार करण्यात आला.