शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
5
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
6
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
7
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
8
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
9
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
10
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
11
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
12
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
13
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
14
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
15
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
16
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
17
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
19
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
20
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

सातारा जिल्ह्यातील धरणसाठा १८ टीएमसीने वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:38 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पावसाचा जोर असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्याच्या काळात जिह्यातील प्रमुख सहा धरणांतील साठा सुमारे १८ टीएमसीने वाढला आहे. सद्य:स्थितीत कोयनेत दोन टीएमसीने साठा वाढून तो ४३.७० वर पोहोचला आहे. तर आवक २४ हजार २१४ इतकी आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील धरणसाठा १८ टीएमसीने वाढलापश्चिम भागात कायम हजेरी कोयनेत २४ हजार क्युसेक पाण्याची आवक

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पावसाचा जोर असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या सव्वा महिन्याच्या काळात जिह्यातील प्रमुख सहा धरणांतील साठा सुमारे १८ टीएमसीने वाढला आहे. सद्य:स्थितीत कोयनेत दोन टीएमसीने साठा वाढून तो ४३.७० वर पोहोचला आहे. तर आवक २४ हजार २१४ इतकी आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली. सुरुवातीला काही दिवस पाऊस कोसळला. पश्चिम भागासह पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस बरसला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.

काही दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. गेल्या एक महिन्याच्या काळात पावसाने तीनवेळा उघडीप दिली आणि पुन्हा हजेरी लावली. गेल्या सोमवारपासून पश्चिम भागात पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पाऊस कोसळत आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९२ तर आतापर्यंत १६७२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धोम धरणात १९१० क्युसेक पाण्याची आवक झाली असून, साठा ४.६४ टीएमसीवर पोहोचला आहे. कण्हेरमध्ये १५४० क्युसेकची आवक होऊन साठा ३.७६ तर उरमोडीत ११६९ क्युसेक पाण्याची आवक होऊन साठा ४.५५ टीएमसीवर गेला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे.कोयनेत १४ टीएमसीने वाढ...कोयना धरणक्षेत्रात जून महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सद्य:स्थितीत साठा ४३.७० टीएमसी इतका आहे. १ जूनपासून धरणात जवळपास १४ टीएमसीने वाढ झाली आहे.दि. ७ जुलैपर्यंत तारळी धरणात ०.०५ टीएमसीने वाढ झाली आहे. तर बलकवडीत ०.०६, कण्हेर ०.९, धोममध्ये ०.५ टीएमसीने वाढ झाली आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ०४  (२९८)कोयना ९२  (१६७२)बलकवडी ३० (७७६)कण्हेर ०७ (२७४)उरमोडी १० (३४४)तारळी २८ (५४७)​​​​​​​साताऱ्यात उघडझाप...साताऱ्यात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस होत आहे. सद्य:स्थितीत पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे सातारकरांना सोमवारी सकाळच्या सुमारास काहीकाळ सूर्यदर्शन झाले. तरीही ढगाळ वातावरण कायम आहे...

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर