लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : गेल्या आनेक वर्षांपसाून सातारा शहर परिसरात आर्थिक दहशत निर्माण करणाºया खंड्यासह त्याच्या चेल्यांची भर रस्त्यावरून निघालेली वरात हजारो सातारकरांनी याचि देही.. याचि डोळा पाहिली. ही धिंड जेव्हा पोवई नाक्यावर धडकली, तेव्हा खंड्या खडबडला. मीडियाच्या कॅमेºयासमोर तोंड चुकविताना भलताच हतबल झाला.खासगी सावकारीचे पाचहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या खंड्या धाराशिवकरला स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई येथे अटक केली होती. त्याची दहशत मोडीत काढण्यासाठी त्याला शहर पोलिस ठाण्यापासून जिल्हा न्यायालयापर्यंत साताºयातील भरगर्दीतून चालवत नेले. दरम्यान, खंड्या अन् त्याच्या साथीदारांना न्यायालयाने सोमवार, दि. ७ पर्यंत पोलिस कोठडी दिली.सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात खंड्या धाराशिवकरवर खासगी सावकारीचे पाचहून अधिक गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिक, कॉन्ट्रॅक्टर, शेतकरी आदींना व्याजाने पैसे देऊन त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा खंड्यावर आरोप आहे. एकापाठोपाठ एक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊ लागल्यानंतर खंड्याने सातारमधून धूूम ठोकली. गेल्या दोन महिन्यांपासून खंड्या पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, खंड्याने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड हे आपली टीम घेऊन मुंबईला रवाना झाले. बुधवारी दुपारी खंड्या न्यायालयात आला असता त्याला मुंबई पोलिसांच्या मदतीने सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले.अधिक चौकशीसाठी त्याला गुरुवारी साताºयात आणले. त्याची दहशत मोडीत काढण्यासाठी सातारा शहर पोलिस ठाण्यापासून जिल्हा न्यायालयात चालवत नेण्यात आले. ही एकप्रकारे धिंडच काढल्याचे समजले जात आहे. त्याला पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती.
धिंड धडकली... खंड्या खडबडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 11:41 PM