स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : बुधवार नाका येथे झालेल्या गोळीबारानंतर उत्तर भारतातून मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्याच्या तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. त्याचे पेव साताऱ्यातही फुटल्याने महाविद्यालयाच्या युवकांंपासून लोकप्रतिनिधीजवळ सर्रास बंदुकी दिसू लागल्या आहेत. दुसरीकडे संशयितांंवर कारवाई करणाºया पोलिसांवर राजकीय दबाव वाढल्याने त्यांचे हात बांधल्यासारखे झाले आहे. या बंदुकीच्या ढिश्क्यांव.. ढिश्क्यांवच्या आवाजामुळे सातारकरांच्या मनात दहशत वाढली आहे.एकेकाळी सातारा शहर हे पेन्शनरांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं. मात्र, गेल्या काही वर्षांत सातारा आपली ओळख बदलू पाहत आहे. सावकारी, खंडणी आणि शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी या घटनांमध्ये वाढत होत आहे. त्या रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. त्यामध्ये खंडणी आणि दरोडासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर जरब बसवण्यासाठी मोक्काचे कायदेशीर हत्यार उपसले. अनेकांच्या मोक्क्यात मुसक्या आवळल्या. त्यामुळे काही प्रमाणात क्राईम रेट कमी झाला. साताºयात शांतता रुजण्यास सुरुवात झाली.तेवढ्यात लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाºयांकडून शासकीय विश्रामगृह, नगरपालिका आदी शासकीय ठिकाणी बंदूक आणि गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी होऊलागली. अगदी रस्त्यावर एकमेकांना दुचाकीचा धक्का लागला म्हणून महाविद्यालयीन युवकाकडून बंदूक आणि धारदार शस्त्रे सर्रास काढली जात आहेत. पोलीस अशा शस्त्रधारी गुंडावर कारवाई करण्यास सुरू करताच लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाºयांकडून पोलिसांवरच दबाव वाढत आहे. पोलिसांनाही केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागतेय.पोलिसांकडून वर्षभरात १२ गावठी कट्टे जप्तसातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत साधारण १२ गावठी कट्टे जप्त केले. हे कट्टे बाळगणारे बहुतेक जण युवक होते. त्यांच्या केलेल्या खुलाशामध्ये अनेकांनी हे कट्टे उत्तरप्रदेश व बिहारमधील लोकांकडून अवघ्या २० हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा कानठळ्यासातारा शहरात कोजागिरी पौर्णिमेला सुरुची बंगल्यासमोर गोळीबार झाला होता. त्याच्या कानठळ्या अजून अनेकांच्या लक्षात आहेत. त्यात बुधवार नाका परिसरात झालेल्या गोळीबारानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा सातारकरांना कानठळ्या बसल्या आहेत. त्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याची हद्द संवेदनशील होत आहे.
ढिश्क्यांव.. ढिश्क्यांवने हादरतोय सातारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 10:59 PM