साखरवाडी/शिरवळ : फलटण तालुक्यातील जिंती येथील रहिवासी व शिरवळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीपराव बाबासाहेब धुमाळ यांची गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली. पुणे याठिकाणी उपचारादरम्यान दिलीपराव धुमाळ यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या तीन दिवसांमध्ये सातारा जिल्हा पोलिस दलातील दोन कर्मचाºयांना अपघातामध्ये मृत्यू झाल्याने सातारा जिल्हा पोलिस दलात शोकाकुल वातावरण आहे.
शिरवळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीपराव धुमाळ हे रविवार, दि. २४ सप्टेंबर रोजी भादे गावच्या हद्दीमध्ये असणाºया वीर धरण परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पेट्रोलिंग करताना वीर धरणावरून परतत असताना शिरवळ-लोणंद रस्त्यावरील माने कॉलनी, भोळी गावच्या हद्दीत दिलीपराव धुमाळ यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.
शिरवळ पोलिस ठाण्याच्या कर्मचाºयांनी दिलीपराव धुमाळ यांना तातडीने शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर सातारा येथील रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांना दि. २५ सप्टेंबर रोजी पुणे याठिकाणी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून धुमाळ यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारादरम्यान प्रकृती गंभीर बनत गेल्यानंतर गुरुवार, दि. २ नोव्हेंबर रोजी धुमाळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिंती येथे नीरा नदीकाठी दिलीपराव धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. धुमाळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, सून, मुली असा परिवार आहे.यावेळी सातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सहायक पोलिस उपनिरीक्षक दिलीपराव धुमाळ यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके, शिरवळ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, पांडुरंग हजारे, प्रकाश फरांदे, वैभव सूर्यवंशी शिरवळ व फलटण पोलिस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.अनेकांकडून श्रद्धांजली अर्पणपुणे येथील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दिलीपराव धुमाळ यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शिरवळ याठिकाणी मृतदेह आल्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिकांच्या वतीने धुमाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर मृतदेह जिंतीकडे नेण्यात आला.