फलटण : धुमाळवाडी (ता. फलटण) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने फलोत्पादन पिकावरील कीड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत डाळिंब या फळ पिकाबाबत शेतीशाळा झाली.
विडणीचे मंडल कृषी अधिकारी अमोल सपकाळ, कृषी पर्यवेक्षक अंकुश इंगळे, कृषी सहायक अजय एकळ, देवराव मदने, चंद्रकांत मंडलिक, प्रमुख मार्गदर्शक डाळिंब विशेषज्ज्ञ कुलदीप नेवसे, धुमाळवाडीचे सरपंच योगेश कदम, ग्रामपंचायत सदस्य समीर पवार, पोलीस पाटील पल्लवी पवार, शरद पवार, बबनराव हुंबे, संजय धुमाळ, सचिन पवार, सतीश सूर्यवंशी, संतोष धुमाळ, सुनील हुंबे, विकास हुंबे, रामदास शिरतोडे व परिसरातील प्रगतशील डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
डाळिंब पिकावरील कीड रोग व्यवस्थापन तसेच एकात्मिक खत व्यवस्थापन, काढणी पश्चात तंत्रज्ञान, निर्यातक्षम डाळिंब उत्पादन याबाबत डाळिंब विशेषज्ज्ञ कुलदीप नेवसे यांनी मार्गदर्शन केले.
मंडल कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी विकेल ते पिकेल, या शासनाच्या महत्त्वाकांक्षी धोरणानुसार उत्पादक कंपन्या व गटांना शासनाच्या स्मार्ट योजनेत सहभागी करून घेता येईल, असे सांगून कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
कृषी पर्यवेक्षक अंकुश इंगळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात शेती शाळेविषयी माहिती दिली. कृषी सहायक अजय एकळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रदर्शन दादासाहेब धुमाळ यांनी आभार केले.