सातारा : आपल्या काव्यमधूर बोलण्यातून सोबत येणाऱ्यावर गारुड घालणाºया अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत जवळ बसून भोजन करण्याची संधी जावळी तालुक्यातील आनेवाडी गावचे निवृत्त शिक्षकव भाजपचे त्या काळातील प्रचारक मधू पवार यांना मिळाला होता. ‘सतारा से आए हो तो डट केखाओ,’ असंही अटलजी त्यांना म्हणाले होते.सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढलेले व लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम पाहिलेले आनेवाडी गावचे मधू पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपल्या जुन्या आठवणी जाग्या केल्या.तुम्ही भाजपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले आहे. अटलजींसोबतच्या आठवणी काही आहेत का? या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशमध्ये गेलो होतो. तेव्हा एका कार्यकर्त्याच्या घरी भोजनाची व्यवस्था केली होती. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष असणाºया अटलबिहारी वाजपेयी यांनाही येथे निमंत्रण होते. एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असणाºया या नेत्याचा कुठलाही बडेजाव नव्हता. मोजकेच कार्यकर्ते सोबत असायचे. अटलजी, त्यांच्या कुटुंबातील मोजके दोघे सदस्य आणि मी स्वत: असे चौघेच डायनिंग टेबलावर जेवायला बसलो होतो. अटलजींच्या शेजारच्या खुर्चीवर बसून मी जेवलो. ही आठवण अजूनही ताजी आहे.’दरम्यान, साताºयातील आठवण सांगताना पवार म्हणाले, ‘जनसंघाच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेतील नोकरी सोडून वसंतदादांच्याविरोधात सातारा-सांगली विधानपरिषदेची निवडणूक लढवली. त्यानंतर जिल्हा बँकेत तत्कालीन संचालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात मी राजवाड्यावरील गांधी मैदानावर उपोषणाला बसलो होतो. त्याच कालावधीत अटलजींची मुंबईत सभा सुरू होती. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मी साताºयात उपोषणाला बसलो होतो, त्याची कोणीतरी अटलजींना माहिती दिली.आपल्या भाषणात तेव्हा त्यांनी ‘उधर सतरा में भ्रष्टाचार के खिलाफ हमारा मधू पवार नामका कार्यकर्ता लढ रहा है,’ असा उल्लेख केला होता.वाईत अटलबिहारी वाजपेयी यांची जाहीर सभा झाली होती, तेव्हा सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचेही पवार यांनी सांगितले. तसेच कुठल्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवणाºया तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही अटलजींच्या सांगण्यावरून व्यासपीठावर येण्याचे मान्य केले होते, असेही पवार यांनी सांगितले. जगात शांतता राहण्यासाठी राजा हा तत्वज्ञ असला पाहिजे, असे प्लुटो म्हणायचा. अटलजींच्या बाबतीत हे तत्त्वज्ञान सार्थठरणारे आहे, असेही पवार यांनी सांगितले.भारत मेरे लिए केवलजमीन का टुकडा नही७० च्या दशकात जनसंघाच्या प्रचारासाठी अटलबिहारी वाजपेयी हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांनी श्री हनुमान जयंतीच्या दिवशी साताºयातील गांधी मैदानावर एक सभा घेतली होती. या सभेच्या शेवटी ‘भारत मेरे लिए केवल जमीन का टुकडा नही ये जिता जागता राष्ट्रपुरुष है....’अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर ते वडूज, वाई, पाचगणी आणि लोणंद येथील कार्यक्रमालाही उपस्थित राहिले होते. तसेच कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली होती.
अटलजींबरोबर बसून जेवणाचा योग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:53 PM