सातारा : साताऱ्यातील नागरिकांना टपाल सेवा व्यवस्थित मिळत नाही. अनेक इमारती चारमजली आहेत. पोस्टमन टपाल पार्किंगमध्ये ठेवून जात असतात. त्यामुळे ते टपाल गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. टपाल वेळेत न मिळाल्याने अनेकदा आर्थिक दंड भरण्याची वेळ सातारकरांवर येत आहे.
000000
वाहनचालकांची चौकशी
सातारा : जिल्ह्यात कोरोना वाढत असल्याने कडक लाॅकडाऊन जाहीर केले आहे. यामुळे पोवई नाका, सातारा मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा परिसरात दुचाकी, चारचाकी वाहनांची तपासणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सातारकर कशासाठी बाहेर पडत आहेत, याची चौकशी केली जात आहे.
पथदिवे बंदच
सातारा : साताऱ्यातील त्रिशंकू भागात गेल्या काही दिवसांपासून पथदिव्यांचे काम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागात पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.
एटीएममध्ये गैरसोय
सातारा : साताऱ्यातील बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही. कोठेही सॅनिटायझर नसल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. सॅनिटायझरची सोय करण्याची मागणी केली जात आहे.
घंटागाड्या सुरू
सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागात पूर्वी घंटागाडी जात नव्हती, त्याठिकाणीही आता पालिकेची घंटागाडी जात आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना सुविधा मिळत आहे. ही सुविधा कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.
पाणी वाया जाण्याचे सत्र
सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करत असलेल्या जलवाहिनीला दररोज कोठे ना कोठे गळती लागत असते. त्यामुळे त्या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असून उतारावरुन पाणी लांबपर्यंत वाहत जात असते. त्यामुळे संबंधित ठिकाणची गळती काढण्याची मागणी केली जात आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
सातारा : कोरोना व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून वडाप बंद होते. त्यामुळे या व्यावसायिकावर बेरोजगारी ओढावली होती. डिसेंबरमध्ये सर्व क्षेत्रे खुली झाली आहेत. त्यामुळे वर्षाअखेरीस तीनचाकी रिक्षा, ट्रॅक्समधून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. ग्रामीण भागात एसटीच्या ठरावीक फेऱ्या होत असल्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासावर निर्बंध असल्याने खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे.