गणपती कोळी : कुरुंदवाडहातामध्ये टाळ व खांद्यावर विणा घेऊन विठ्ठल नामाचा गजर करीत शिरढोण (ता. शिरोळ) येथील पंढरीची वारी गेल्या वीस वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. आषाढीमध्ये वारकरी येथील रिंगण सोहळ्यात सहभागी होतात. तर पायी दिंडी श्रावणामध्ये काढली जाते. प्रारंभी एक दिंडी असलेली सोयीच्या दृष्टिकोणातून एकाचवेळी वेगवेगळ्या भागांतून पाच दिंड्या निघतात. विठ्ठलाच्या अफाट श्रद्धेतून पंढरीच्या या रस्त्याने शिरढोणसह परिसरातील शेकडो तरुणांना व्यसनापासून मुक्ती दिली आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी दिंडीतील लोकांचा सहभाग वाढतो आहे.येथे सर्व देवदेवतांची मोठी मंदिरे आहेत. प्रत्येक समाजाकडून या देवदेवतांचा आदर राखला जातो. पाश्चात संस्कृतीचा वाढता प्रभाव मोडून काढून आपली संस्कृती अबाधित राखण्यासाठी व तरुणांना व्यसनापासून मुक्त करून आध्यात्माकडे वळावे यासाठी गावातील धार्मिक व वारकऱ्यांच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून महादेव मंदिरात श्रावणामध्ये विणा सप्ताह ठेवला जातो. त्याची परंपरा आजतागायत चालू आहे. विणा सप्ताहाचा समारोप पंढरपूरच्या पायी दिंडीने करण्याची संकल्पना १९९४ साली माजी सरपंच नानासो पाटील, तम्माप्पा कुंभार, कै. गोविंदा सूर्यवंशी, बापट कोळी, मायगोंडा कोळी, आदी मंडळींनी केला.दिंडी प्रमुखांनी पुढाकार घेऊन एकादशी, द्वादशी बरोबरच सायंकाळी इतरत्र गप्पा मारून वेळ घालविण्यापेक्षा तरुण या मंदिरात सायंकाळी बसून भजन, पूजन व नामस्मरणात वेळ घालवितात.
शिरढोणच्या वारकऱ्यांचा प्रत्येक वर्षी दिंडीतील सहभाग वाढतोय
By admin | Published: July 04, 2014 11:20 PM