शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ऊस हवा तर ठिबक करा

By admin | Published: February 15, 2016 10:51 PM

शरद पवार : बाळूपाटलाचीवाडी येथे २०० एकर ठिबक सिंचन योजनेचा शुभारंभ

लोणंद : ‘आज पाणी टंचाईचे मोठे सावट राज्यावर आहे. वीर धरणाची पाणीपातळी खालावल्याने पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. इंडोनेशिया देशाने ४० दिवस पाणी लागणार नाही, अशी उसाची प्रजाती बनविली आहे. उसाला जास्त पाणी लागले हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. एक एकरासाठी पाटाने जेवढे पाणी लागते ते पाणी ड्रीपने तीन एकर शेतीस पुरते. त्यामुळे बाळूपाटलाचीवाडी येथील सामुदायिक ड्रिपचा इतरांनी आदर्श घेणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. खंडाळा तालुक्यातील बाळूपाटलाचीवाडी येथे म्हातलिंग जलउपसा सिंचन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या सामुदायिक २०० एकर ठिबक सिंचन योजनेचाा शुभारंभ व श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती राजराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब सोळस्कर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, जिल्हा बॅँक संचालक दत्तानाना ढमाळ, आनंदराव शेळके-पाटील, सभापती नितीन भरगुडे-पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, रमेश धायगुडे-पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.पवार म्हणाले, ‘लोणंद सारख्या ठिकाणी १०० बेडचे रुग्णालय उभारणे व ते सक्षमपणे चालविणे हे काम धाडसाचे असून, कौतुकास्पद आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटलने अल्पावधीत रुग्णांचा विश्वास संपादन केला असून, या रुग्णालयाने जिल्ह्णात नावलौकिक मिळविला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असून, बाळूपाटलाचीवाडी येथील शेतकऱ्यांचा पाणी बचतीचा उपक्रम राज्याला मार्गदर्शक आहे. या सामुदायिक ड्रीप उपक्रमाचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा,’ लोणंदचे चित्र झपाट्याने बदलले असून कारखानदारी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तालुक्यात विकासाबरोबरच बार संस्कृती देखील वाढताना दिसत आहे. व्यवसाय वाढले पाहिजेत मात्र, चांगले व्यवसाय वाढले पाहिजेत,’ असेही यावेळी शरद पवार म्हणाले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, डॉ. नितीन सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी किसन धायगुडे, आनंदराव कदम, बापूराव धायगुडे, राजू धायगुडे, अशोक कदम, कांतिलाल धायगुडे, सरपंच शुभांगी धुमाळ, दत्तात्रय धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर) शरद पवार यांचा एक तपानंतर कार्यक्रमरामराजे म्हणाले, जिल्ह्यात डॉ. सावंत व सिद्धिविनायक हॉस्पिटलने वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हा बॅँकेच्या नफ्यातील ५० कोटी रुपये आम्ही ड्रीपसाठी दिले असून, भविष्यात ड्रीप शिवाय पर्याय नाही.’ दरम्यान, शरद पवार यांचा एक तपानंतर तालुक्यात कार्यक्रम झाला.