शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
3
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
4
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
5
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
6
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
7
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
8
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
9
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
10
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
11
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
12
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
13
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
14
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
15
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
16
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
17
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
18
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
19
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
20
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या

रस्त्यावर घाण केल्यास थेट दंडाची पावती : स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाले अधिकार शासनाचा अध्यादेश; खासगी जागेत घाण करणाºयांना चाप; कचरा टाकणे, थुंकणेही महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:25 IST

मलकापूर : सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयावर दंडात्मक कारवाई करण्याचे थेट अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. याबाबत थेट कायदाच तयार

मलकापूर : सार्वजनिक जागेत कोणत्याही प्रकारची घाण करणाºयावर दंडात्मक कारवाई करण्याचे थेट अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. तसा कायदाच शासन स्तरावर झाला असल्यामुळे सार्वजनिक जागेत घाण करणाºयांनी यापुढे सावधान राहिले पाहिजे. याबाबत थेट कायदाच तयार झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी घाण टाकणे, शौचास जाणे किंवा थुंकणेही महागात पडणार आहे.

आत्तापर्यंत एखादे चुकीचे काम केल्यास पोलिस, आरटीओ अशा खात्यालाच थेट दंडात्मक कारवाईचे अधिकार प्राप्त होते. मात्र, अशा प्रकारच्या खात्यांबरोबरच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सरकारने नवीन कायदा तयार केला आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण केल्यास पोलिस व आरटीओप्रमाणे थेट दंड आकारण्याचे अधिकार पालिका व पंचायतींना देण्यात आले आहेत. तसा अध्यादेशही सर्व पालिकांना देण्यात आला आहे. त्यामधे सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, उपद्रव होऊ शकेल असे टाकाऊ पदार्थ टाकणे, अस्वच्छ परिस्थिती निर्माण करणे तसेच या नियमान्वये प्रतिबंधित करूनही सार्वजनिक सुव्यवस्था, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, स्वास्थ्य बाधित होईल, अशी अस्वच्छता करणाºयास दंड करण्याचे अधिकार देण्यात आले.

सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी निष्काळजीपणाने टाकलेली, फेकलेली, पसरवलेली घाण किंवा सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी घाण टाकणारी, फेकणारी, पसरवणारी कृती अशा सर्व घटकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या शासन नियमांमध्ये वापरलेले शब्द व वाक्यांमध्ये ज्यांची व्याख्या केलेली नाही, अशा सर्व बाबींसाठी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण अधिनियम १९८१, कचरा व्यवस्थापन नियम यापैकी संबंधित अधिनियम / नियमामध्ये नियुक्त केल्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था दंड आकारणार आहेत....अशी होणार दंडात्मक कारवाईउघड्यावर शौचास गेल्यास पाचशे तर घाण टाकल्यास १५० रुपये दंड केला जाणार आहे. रस्ते, मार्गावर घाण करणाºयांसाठी ‘अ’ व ‘ब’ वर्ग पालिका कार्यक्षेत्रात १८० रुपये तर ‘क’ व ‘ड’ वर्ग पालिका तसेच पंचायत क्षेत्रात १५० रुपये दंड आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ‘अ’ व ‘ब’ वर्ग पालिका क्षेत्रात दीडशे रुपये, ‘क’ व ‘ड‘ वर्ग पालिका तसेच पंचायत क्षेत्रात शंभर रुपये दंड ठरवला आहे. उघड्यावर लघुशंका करणारास ‘अ’ व ‘ब’ वर्ग पालिका क्षेत्रात २०० रुपये, ‘क’ व ‘ड’ वर्ग पालिका तसेच पंचायत क्षेत्रात १०० रुपये दंड करण्यात येणार आहे.उघड्यावर शौच करणाºयांना अ, ब, क, ड वर्ग पालिका क्षेत्रात ५०० रुपये दंड करण्यात येणार आहे.कचरा टाकणाºयास  जागेवरच पावतीनवीन कायद्यानुसार ‘स्पॉट फाईन’ करण्यासाठी नेमलेल्या पथकाकडे दंडाचे पावती पुस्तक देण्यात आले आहे. स्वच्छतेबाबत कोणत्याही कारणांमुळे एखाद्याला ‘आॅन दी स्पॉट’ पकडले तर त्याचक्षणी त्याला दंडाची पावती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मलकापूर नगरपंचायतीने ही जबाबदारी वसुली कर्मचाºयांवर सोपवली आहे.नळ कनेक्शन बंद किंवा घरपट्टीत समावेशएखाद्या नागरिकाने स्वच्छतेबाबत केलेल्या गुन्ह्यात वाद घालत दंड न भरल्यास त्या घटनेचे फोटो काढून पुरावा तयार केला जातो. त्यानंतर संबंधित नागरिकाचे नळ कनेक्शन बंद करण्याची तरतूद कायद्यात आहे. तरीही दंड नाही भरल्यास या दंडाची रक्कम घरपट्टीत समावेश करणे व अंतिम उपाय म्हणून संबंधितावर गुन्हा दाखल करून न्यायालयात उभे करण्याची तरतूद करण्यात आली आहे.बाहेरील  व्यक्तीवर थेट गुन्हास्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत तयार केलेल्या कायद्यानुसार कामानिमित्त शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी एखादा गुन्हा केला. त्याने नियमानुसार ‘स्पॉट फाईन’ भरण्यास असमर्थता दाखवल्यास संबंधित व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अंतर्गत न्यायालयात १ हजार ते १ हजार ५०० पर्यंत दंड होऊ शकतो.तीन दिवसांत १ हजार ९५० दंड वसूलस्वच्छतेबाबत राज्य शासनाने केलेल्या नवीन कायद्याची मलकापूर नगरपंचायतीने तत्काळ अंमलबजावणी केली आहे. उघड्यावर शौचास बसलेल्या परगावच्या ३ नागरिकांकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे १ हजार ५०० तर उघड्यावर घाण टाकणाºया ३ नागरिकांकडून प्रत्येकी १५० रुपयाप्रमाणे ४५० रुपये असा तीन दिवसांत १ हजार ९५० रुपये दंड मलकापूर नगरपंचायतीने वसूल केला आहे.‘स्पॉट फाईन’साठी स्वतंत्र पथकशहरात उघड्यावर घाण करणारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने नवीन कायदा केला आहे. ‘स्पॉट फाईन’चे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. या कामासाठी पालिकांना स्वतंत्र पथकाची नेमणूक करावी लागणार आहे. त्यानुसार मलकापूर नगरपंचायतीने पाच कर्मचाºयांचे पथक तयार केले आहे. हे पथक पहाटे पाच ते सकाळी आठपर्यंत प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहेत. त्यासाठी चार प्रभागांत चार व एक फिरत्या कर्मचाºयाचा या पथकात समावेश केला आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शासनाने ३० डिसेंबरला नवीन अध्यादेश काढला आहे. त्यानुसार स्वच्छतेबाबत सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर घाण करणाºयावर थेट कारवाई करण्याचे अधिकार पालिकांना देण्यात आले आहेत. त्याची मलकापुरात तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. तीन दिवसांत सहा जणांवर कारवाई केली आहे. सर्व सुविधा देऊनही जर उघड्यावर घाण करत असेल तर यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही.- संजीवनी दळवी, मुख्याधिकारी, मलकापूर