येथील मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित आनंदराव चव्हाण विद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य एस. वाय. गाडे म्हणाले, विद्यार्थीदशेत आपल्याला जिथे व्यक्त होण्याची संधी मिळते, त्या संधीचा फायदा घेतलाच पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषण स्पर्धेमध्ये आपले नाव पहिल्यांदा गेले पाहिजे. हीच तुमच्यासाठी चालून आलेली संधी होईल.
मराठी विषय शिक्षिका एस. आर. भोरे यांनी मराठी भाषा किती समृद्ध आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तर एम. पी. फराळे यांनी मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करावा, असे मत व्यक्त केले.
प्राचार्य एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक एस. बी. शिर्के, पर्यवेक्षक अनिल शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी सुफिया सय्यद हिने सूत्रसंचालन केले, तर अनिल शिर्के यांनी आभार मानले.
फोटो : २८केआरडी०४
कॅप्शन : मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन रंजना पवार यांच्या हस्ते करण्यात आले.