शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

खड्डा की डबर.. कोडं काय उलगडेना..!

By admin | Published: October 10, 2016 12:01 AM

पुसेगाव मार्गावरील स्थिती : वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

 वडूज : येथील पुसेगाव रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात पडलेल्या खड्ड्यामुंळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यामुळे अपघातांमध्ये वाढ झाली असून, हा खड्डा आहे की डबर? हा एकच सवाल सर्वांसमोर उभा ठाकला आहे. वडूज-पुसेगाव हा मुख्य रहदारीचा रस्ता असून, जिल्ह्याच्या ठिकाणावरून ये-जा करण्याचा हा एकमेव प्रमुख रस्ता आहे. दररोज हजारो वाहने वडूज-सातारा असा प्रवास याच रस्त्यावरून करतात. या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. कारण याच ठिकाणी छोटा ओढा असल्याने खड्डे चुकविताना प्रसंगी वाहनचालक या ओढ्यात घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाला या समस्येबाबत सूचना केल्या आहेत. याविषयी हा विभाग गंभीर दखल घेत नसल्याचे लक्षात येत असून, या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची संबंधित विभाग वाट पाहत आहे का? असा सवालही वाहनचालकांमधून निर्माण होत आहे. सहायक निबंधक कार्यालय, बाजार समिती, न्यायालय या रस्त्याच्या परिसरात असून देखील संबंधित विभाग याविषयी गांधारीची भूमिका बजावत असल्याचे सदृश्य चित्र पाहवयास मिळत आहे. (प्रतिनिधी) उपाययोजनेची मागणी खड्ड्यांप्रमाणेच रस्त्यालगत असणारी झुडपे यामुळे ही अपघाताला निमंत्रण मिळत आहे. यापूर्वी वडूज-दहिवडी रस्त्यालगत असणारे मोठे खड्डे या विभागाने एका संघटनेने केलेल्या अभूतपूर्व आंदालेनामुळे तातडीने दुरुस्त केले. याचाच अविभाज्य भाग की काय म्हणून या रस्त्यावर असणारे खड्डे मुजविण्यासाठी आणि रस्त्यालगतची झुडपे काढण्यासाठी अशाच आंदोलनाची वाट पाहत हे विभाग हातावर हात ठेवून बसले आहे की काय? असा यक्षप्रश्न ही सामान्यांना पडला आहे.