शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
3
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
4
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
5
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
6
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
7
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
8
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
9
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
10
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
11
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
12
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
13
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
14
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
15
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
16
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
17
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
18
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
20
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती

धरणं नाही भरलं, तरीही सिंचनासाठी पाणी सोडलं; सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू

By नितीन काळेल | Published: August 28, 2023 12:59 PM

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील ...

सातारा : ऑगस्ट महिना संपत आलातरी यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. त्यामुळे पूर्व बाजुला दुष्काळाची स्थिती असून पश्चिमेकडील धरणेही पूर्ण भरलेली नाहीत. अशातच सिंचनासाठी पाण्याची मागणी असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे धरणे भरणार कधी असा प्रश्न निर्माण झालेला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात धोम, कण्हेर, तारळी, बलकवडी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे धरण प्रकल्प आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता ही १४८ टीएमसीवर आहे. या धरणातील पाण्यावरच अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच याच धरणातून सिंचनासाठीही पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यात ही धरणे भरण्याची आवश्यकता असते. तरच तरतुदीनुसार पाणी विसर्ग करताना अडचणी येत नाहीत. मात्र, यंदा जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण कमी राहिलेले आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही अपुरा पाऊस झालेला आहे. त्यातच सध्या बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठाही वाढेना अशी स्थिती आहे. त्यातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे पाणी प्रकल्प भरणार का याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणात सध्या ८६.३५ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजेच धरण भरण्यासाठी अजून १९ टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यातच सध्या धरणक्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. सध्या धरण भरले नसतानाच सांगली जिल्हा जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी मागणी झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू करण्यात आली आहेत. त्यातून २१०० क्यूसेक पाणी विसर्ग सांगलीतील जलसिंचनासाठी करण्यात येत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे. त्याचबरोबर इतर धरणातूनही विसर्ग करण्यात येत आहे.जिल्ह्यातील कोयना धरणाबरोबरच धोम, कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही सिंचनासाठी विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. सध्या यातील कोयना धरण ८२ टक्के भरलेले आहे. तर धोम धरण ८४ टक्के, कण्हेर ८१.३९ आणि तारळी धरण ९१.६५ टक्के भरलेले आहे. सर्वात कमी पाणीसाठा उरमोडी धरणात ६०.८५ टक्के आहे. हे धरण भरण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. तरच उरमोडी यंदा भरणार आहे.

नवजाला ६० मिलीमीटर पाऊस...जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरुच आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद नवजाला ६० मिलीमीटरची झाली. त्यानंतर कोयनानगर येथे ४७ आणि महाबळेश्वरला ४० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. नवजाचे पर्जन्यमान पाच हजार मिलीमीटरच्या उंबरठ्यावर आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसDamधरणWaterपाणी