खंडाळा : सातारा व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. वीर धरणातून सुमारे २२,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नीरा नदीतही पाणी वाढू लागले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याची माहिती वीर धरण अभियंता विजय नलवडे यांनी दिली.
गेल्या चार दिवसात नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा-देवघर, गुंजवणी या तिन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरु असल्याने धरण क्षेत्रात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी वाढत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक होत असल्याने वीर धरणाच्या विद्युतगृहातून ८०० क्युसेक व दरवाजातून २१,५०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे.
या तिन्ही धरण क्षेत्रांमधील पाणी वीर धरणात पोहोचत असल्याने वीर धरण सुमारे ७० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे उचलण्यात आले असून, त्यातून २१,५०५ क्युसेक व विद्युतगृहातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
.....................
२४ खंडाळा
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.