शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

‘दादां’च्या दौऱ्याने अनेकांना भरलाय ताप, चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:02 AM

भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कऱ्हाड दक्षिणचा दौरा केला. त्यांचा हा दौरा त्यांनी जरा उरकताच घेतला. त्यामुळे रात्री एका सभागृहात आयोजित केलेला संवाद मेळावा

ठळक मुद्देसुरेखा पाटलांनीही घेतली चंद्रकांतदादांची भेटदादा म्हणे.. यादव-पाटलांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी

प्रमोद सुकरे ।कऱ्हाड : भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी कऱ्हाड दक्षिणचा दौरा केला. त्यांचा हा दौरा त्यांनी जरा उरकताच घेतला. त्यामुळे रात्री एका सभागृहात आयोजित केलेला संवाद मेळावा झालाच नाही. दादांच्या तब्बेत बरोबर नाही. त्यांना ताप भरलाय, अशी चर्चा होतीच. त्यामुळे त्यांनी आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे प्रयाण केले खरे; पण त्यांच्या या दौऱ्याने विरोधकांसह काही स्वकीयांनाही ताप भरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्याला भाजपने लक्ष्य केलेले दिसते. त्याचाच भाग म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सलग तीन दिवसांचा जिल्हा दौरा केला. बुधवारी दुपारी ते कºहाडला आले. सकाळपासूनचे रखडलेले कार्यक्रम त्यांनी घाईगडबडीतच पूर्ण केले. त्यानंतर या दौºयात अनेकजण त्यांना भेटले. तर ते स्वत: अनेकांना भेटले. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याने विरोधकांना चांगलाच ताप भरल्याची चर्चा.

शिवाय या दौºयात त्यांनी स्वकीयांनाही या दौºयात कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. शिवाय कºहाडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आयोजित केलेल्या भव्य युवक मेळाव्यात त्यांनी ‘गुगली’ टाकत राजेंद्र यादव यांना भाजप नक्कीच ताकद देईल, असे सांगतानाच येथे भाजपच्या नगराध्यक्षा आहेत. तुम्हीही या प्रवाहात आलात तर विकास गतीने होईल, असे मी त्यांना म्हटले होते. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर जयवंत पाटील यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी प्रीतिभोजन होऊन यादव-पाटलांनी आपला निर्णयही मला सांगितला. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची फक्त औपचारिकताच बाकी असल्याचे त्यांनी सांगून टाकले. आपल्या भविष्यातील राजकीय डावपेचातील काही पत्ते मंत्री पाटील यांनी ‘ओपन’ केल्याने अनेकांना चांगलाच ताप भरल्याची चर्चा आहे.काहींची दांडी, काही सुरक्षित अंतरावरमंत्री पाटील यांच्या या दौºयात कऱ्हाड पालिकेने कोल्हापूर नाक्यावर उभारलेल्या यशवंतराव चव्हाण स्वागत कमानीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते घेतले. या कार्यक्रमाला शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले यांच्यासह मान्यवरांचीही उपस्थिती होती. भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आघाडीचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची उपस्थिती ओघाने आलीच; पण विरोधी लोकशाही आघाडीच्या नगरसेवकांनी याकडे पूर्णपणे पाठ फिरवली. भाजपचेही काही नगरसेवक कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसले नाहीत. तर यशवंत जनशक्ती आघाडीच्या काही नगरसेवकांनीही येथे दर्शन दिले नाही. तर उपस्थित असणारे काही नगरसेवक सुरक्षित अंतरावरच दिसत होते.सुप्त संघर्ष मिटल्याची चर्चा

कऱ्हाड शहरात पावसकर व यादव या दोघांचे स्वतंत्र गट कार्यरत आहेत. पण त्यांच्यात काही वर्षांपासून सुप्त संघर्षही दिसतोय. शिवजयंती मिरवणुकीवेळीही तो अनेकांना दिसून आलाय. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या दौºयानंतर या दोघांतील हा सुप्त संघर्ष मिटल्याची चर्चा आहे.

चंद्रकांतदादा जयंतकाका भेटीचीही चर्चामंत्री पाटील यांच्या दौºयातील एक कार्यक्रम येथील गजानन हौसिंग सोसायटीत झाला. सोसायटीला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळावा, यासह इतर मागण्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सोसायटीतील नागरिक सांगत असले तरी या सोसायटीचे चेअरमन हे कºहाड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे बंधू जयंत पाटील हे आहेत. हे नजरेआड करता येणार नाही. या कार्यक्रमात काकांनी दादांचे स्वागत केले. व काही विषयांवर चर्चाही केली. भले ती सोसायटीच्या प्रश्नांबाबत असेल; पण राजकीय वर्तुळात याची वेगळीच चर्चा आहे.उदयनराजेंच्या गैरहजेरीचीही चर्चाराजेंद्र यादव हे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे यादवांचा वाढदिवस आणि राजेंची हजेरी हे जणू समीकरणच बनले होते. मात्र, या समीकरणाला बुधवारी छेद गेला. त्यामुळे यादवांच्या युवक मेळाव्याला उदयनराजे का अनुपस्थित राहिले, याचीही चर्चा सुरू आहेच.पटवेकरांचं दर्शनच नाही

स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी लागावी म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणारे फारुख पटवेकर बुधवारच्या पाटलांच्या दौऱ्यात कुठेच दिसले नाहीत. उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी झालेल्या प्रीतिभोजनावेळी पटवेकर सपत्नीक उपस्थित होते. तेथेच त्यांना चंद्रकांत पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक करण्याचा ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र, आता भाजपच्या माध्यमातून मेहरबान झालेले पटवेकर मंत्री पाटलांच्या दौºयात कुठेच न दिसल्याने याची चर्चा तर होणारच.

सुरेखा पाटलांनीही घेतली चंद्रकांतदादांची भेटविलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या समर्थक असणाऱ्या पंचायत समिती सदस्या असणाºया सुरेखा पाटील यांनीहीसोमवार पेठ येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्री पाटील यांची भेट घेतली. एवढेच नव्हे तर त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही त्या दिसत होत्या.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलSatara areaसातारा परिसर