शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पवारांच्या गुगलीची पाटणमध्ये चर्चा

By admin | Published: January 14, 2016 10:11 PM

विक्रमसिंह पाटणकरांना श्रेय : लोकनेत्यांच्या कारकिर्दीचे पोस्टमार्टम

पाटण : राष्ट्रीय नेते आणि यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या पाटण दौऱ्यात त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या उत्तरार्धाच्या शेवटच्या टप्प्यात पाटण तालुक्याचे शिल्पकार असे सांगून टाकले. असे करताना त्यांनी पाटण तालुक्यातील भाषणात प्रथमच धाडसी पाऊल टाकत थेट बाळासाहेब देसार्इंच्या कारकिर्दीचे पोस्टमार्टम केले. पवारांच्या या गुगलीमुळे पाटणच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.पाटण येथे झालेल्या कार्यक्रमात विक्रमसिंह पाटणकर यांच्या २६ वर्षांच्या राजकारणातील ‘विकासाचा सुवर्णकाळ’ या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांनी केले. त्यामुळे साहजिकच विक्रमसिंह पाटणकर राजकीय पूर्णविराम घेणार असे संकेत मिळाले. तर दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांच्याकडून राष्ट्रवादीच्या अपेक्षा वाढलेल्या दिसल्या. विक्रमसिंह पाटणकर यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे सर्टिफिकेट त्यांच्या नेत्यांनी देणे, हे क्रमप्राप्त होते.मात्र, असे करताना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब देसाई यांच्या कार्यकिर्दीबाबत उणिवा शोधावे, हे शरद पवारांच्याशिवाय कुणी करू शकत नाही. त्यामुळे आलेली संधी ओळखून शरद पवार यांनी बाळासाहेब देसार्इंचे नाव न घेता टीका केली. पवार म्हणाले,‘यशवंतराव चव्हाण यांच्या नंतरचे नेतृत्व म्हणून पाटणच्या नेतृत्वाचा लौकिक होता. १९५२, ६७, ७२, १९७७, ८३ या सालांपर्यंत पाटणच्या जनतेकडे राज्याची सत्ता होती. परंतु त्यानंतरही सुमारे १५० गावांना वीज मिळाली नव्हती. रस्ते नव्हते. लोक मैलन्मैल चालत येत होते. त्यानंतर मग आम्हीच काहीतरी बदल केला पाहिजे म्हणून विक्रमसिंह पाटणकरांना राजकारणात आणले. पाटणचे खरे शिल्पकार हे विक्रमसिंह पाटणकर आहेत, असे पवार यांनी सांगितले. पवारांच्या या राजकीय खेळात विक्रमसिंह पाटणकर हिरो ठरले आहेत. तर दुसरीकडे सत्यजित पाटणकर यांनी आता पाटणकर गटाची धुरा खांद्यावर घेऊन आक्रमक व्हावे. पुढे काय करायचे ते बघू,’ असा सल्ला शरद पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)रामराजेंनी नातेसंबंध असल्याची पुष्टी जोडलीविधानपरिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पाटणमध्ये बोलायचे म्हणजे माझी अडचण होते. कारण देसाई-पाटणकर घराण्यांशी माझे नातेसंबंध आहेत. त्यामुळे कोणाला गोंजरायचं आणि कोणाला दुखवायचं, असा प्रश्न पडतो; पण विधानसभेत असताना पाटणचा प्रश्न उपस्थित करण्याची तळमळ मला विक्रमसिंह पाटणकर यांच्यात दिसली.’आम्ही केलेल्या रस्त्यावरून जाऊन शंभूराज देसाई गावागावांत आमच्या विरोधात बोलतात. आम्ही उभ्या केलेल्या सभामंडपात सभा घेतात. नळ योजनेचे पाणी पितात, असा टोला माजी विक्रमसिंह पाटणकर यांनी लगावला. तर आता रस्ते मी केलेत; परंतु त्या रस्त्यातील खड्डे मुजविण्याचे काम तरी करा, अशी अपेक्षाही पाटणकरांनी व्यक्त केली.