वाई : वाई तालुक्यातील पिराचीवाडी गावामध्ये निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात आली. सर्व गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्याचे काम जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे व शेदुरजणे गणाच्या पंचायत समिती सदस्य ऋतुजा शिंदे यांनी केले.
विराज शिंदे म्हणाले, ‘सातारा कोरोनाबाबत ‘रेड झोन’मध्ये आहे. कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागांमध्ये झाला आहे. सगळे निर्बंध असतानाही परिस्थिती चिघळत चालली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह मजूर, शेतकरी यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये निर्जंतुकीकरण करत आहोत. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.’
सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर म्हणाले, ‘युवक काँग्रेस कोरोना काळात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करत असलेल्या कामामुळे लोकांना दिलासा मिळत आहे.’
या निर्जंतुकीकरण मोहिमेवेळी युवराज कोंढाळकर, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्जेराव कोडके, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मांढरे, शुभांगी पोळ, वैशाली कोचळे, हणमंत कोंढाळकर, राजेंद्र कोंढाळकर, विश्वजित पोळ, दत्तात्रय कोंढाळकर, शशिकांत कोंढाळकर, अक्षय पोळ, आकाश पोळ, अक्षय कोंढाळकर, सचिन कोंढाळकर, अंकुर भोसले, प्रथमेश कोचळे, अनिल कोचळे, संकेत पोळ, वैभव पोळ, शुभम कोचळे उपस्थित होते.