मल्हारपेठ : मारुल हवेली येथे ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ग्राम स्वच्छता करून ग्रामस्थ व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या अनुयायांनी घरोघरी स्वच्छतेचा संदेश दिला.मारुल हवेली, ता. पाटण येथील सारंग पाटील यांच्या अनुयायांनी ग्रामस्वच्छता केली. बैठकीत स्वयंसेवक व ग्रामस्थांनी सहा ट्रॅक्टर, एक जेसीबी व औजारे यांच्या मदतीने मारुल हवेली गाव अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, जोड रस्ते, गटारे यांची सफाई करण्यात आली. परिसरातील वस्त्या व गावे यांच्यातील ग्रामस्वच्छता करून २५ टन घाण, कचरा गोळा केला व त्याची विल्हेवाट लावली. सुमारे ३०० स्वयंसेवकांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा ध्यास घेऊन कामास सुरुवात केली. सारंग पाटील यांनी या कार्यात सातत्य राखण्यास सांगितले. तसेच गावच्या एकीसाठी आपली मनेही स्वच्छ राखा, अपेक्षितांना मदत करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच शिंदे, देसाई कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील, ग्रामस्थ, युवा मंडळाचाही या मोहिमेत सहभाग होता. (प्रतिनिधी)
२५ टन कचऱ्याची मारुल हवेलीत विल्हेवाट
By admin | Published: February 03, 2015 9:37 PM