शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

शेतातून ट्रॅक्टर नेण्यावरून वाद, उसासकट पेटवून देण्याची तरुणाला धमकी; एकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 5:48 PM

सातारा : शेतातून ट्रॅक्टर का नेलास, असे विचारत एका तरुणाला तुझ्या उसासकट तुला पेटवून देईन, अशी धमकी देऊन मारहाण ...

सातारा : शेतातून ट्रॅक्टर का नेलास, असे विचारत एका तरुणाला तुझ्या उसासकट तुला पेटवून देईन, अशी धमकी देऊन मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार (दि. २६) रोजी ललगुण, ता.खटाव येथे घडली. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रताप अनिल घाडगे उर्फ छकुल्या (रा. ललगुण. ता. खटाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिषेक अंकुश जाधव (वय २०, रा. ललगुण, ता. खटाव, मूळ रा. जांब खुर्द, ता. कोरेगाव) याने मामाचा उसाचा ट्रॅक्टर प्रताप घाडगे याच्या चुलत चुलत्याच्या शेतातून नेला. या कारणावरून घाडगे याने अभिषेकला उसासकट पेटवून देण्याची धमकी दिली. तसेच उसाच्या दांडक्याने मारहाण केली. यामध्ये अभिषेकच्या अंगावर सर्वत्र वळ उटले आहेत. या प्रकारानंतर अभिषेक जाधवने पुसेगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी हवालदार बर्गे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी