शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

वाद मिटला पाहिजे, सर्व ठिकठाक होईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:55 PM

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उचललेलं शिवधनुष्य थोडसं पेललं.आता तर भाजपही कमळ फुलवू पाहतंय. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव ...

प्रमोद सुकरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता म्हणे. अंतर्गत संघर्षाचे ग्रहण असूनही त्याला फारसा फरक पडला नाही. मात्र, राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष नंबर एक बनला. सेनेनेही उचललेलं शिवधनुष्य थोडसं पेललं.आता तर भाजपही कमळ फुलवू पाहतंय. अशा सर्व परिस्थितीत काँग्रेसला जिल्ह्यात गतवैभव आणायचे असेल तर अंतर्गत वाद मिटला पाहिजे. मग सर्वकाही ठिकठाक होईल, असा साक्षात्कार नेत्यांना झालेला दिसतोय. या संदर्भातील पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर यांची ताजी वक्तव्ये बरंच काहीसांगून जातात. त्याच्यावर सध्या जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरूआहे.सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण बाबा गट व काका गट हा तसा खूप जुना वाद आहे. त्याला अनेक कारणांची फोडणी मिळाल्याने हा वाद वाढतच गेला आणि परिणामी त्याचा फटका जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाला बसला, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आज तर जिल्ह्यात काँगे्रसचे फक्त दोनच आमदार दिसतात. ती संख्या वाढवायची असेल तर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत वाद मिटणे गरजेचे आहे.त्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना कºहाड दक्षिणमधून माझी उमेदवारी हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय होता. तो समजून घ्यायला हवा होता, असे सांगत जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी आधी कºहाड दक्षिणेतील बाबा-काका गट हा वाद मिटला पाहिजे, अशी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. तर पोतले येथील कार्यक्रमात माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी मी आगामी विधानसभेची निवडणूक लढणार नाही; पण काळजी करू नका.सगळे काही ठिकठाक होईल, असा जाहीर सभेत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे बाबा-काका गटांतील वाद मिटून नजीकच्या काळात जिल्ह्यात काँगे्रस ठिकठाक होईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.काकींनीच दिली काकांना उमेदवारीप्रेमिलाताई चव्हाण १९८४ मध्ये इंदिरा काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनीच पहिल्यांदा विलासराव पाटील-उंडाळकर यांना कºहाड दक्षिणमधून विधानसभेची उमेदवारी दिली, असे सांगितले जाते. त्यानंतर अनेक वर्षे प्रेमिलाताई काकी व विलासराव काका यांच्यात सलोख्याचे संबंध होते.... तर अटीतटीचा सामना झाला असतावास्तविक, १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासराव पाटील-उंडाळकर हे एस काँग्रेसमधून आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात इंदिरा काँग्रेसचे उमेदवार उभे होते बाळासाहेब शेरेकर. वास्तविक, त्यावेळी जयवंतराव भोसले यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी का नाकारली याबाबत आजही उलट-सुलट मते मांडली जातात. उंडाळकरांच्या विरोधात रेठरेकर उमेदवार असते तर ती निवडणूक अटीतटीची झाली असती.यापूर्वीही झाला होता वाद मिटविण्याचा प्रयत्नपृथ्वीराज चव्हाण यांची राज्याच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ही बाब उंडाळकरांना साहजिकच पचनी पडणारी नव्हती. त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याने तेच कºहाड दक्षिणमधून लढणार, हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या माध्यमातून हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न झाला होता. मात्र, त्याला यश आले नाही.पुन्हा एकदा प्रयत्न सुरूराज्यात व देशात जातीवादी पक्षाला रोखण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्रित यावे, असा राग आळवला जात आहे. त्यामुळे समविचारी पक्षांची मोट बांधत असताना काँगे्रसअंतर्गत मतभेदही मिटले पाहिजेत, अशा सूचना दिल्या गेल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना होमपीचवरील वादही मिटविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. शिवाय उंडाळकरही काँग्रेस विचारधारेपासून दूर गेलेले नाहीत. हे त्यांनी गत सहा महिन्यांत सुशीलकुमार शिंदे व शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या घेतलेल्या कार्यक्रमांवरून स्पष्ट होते. साहजिकच या साऱ्या बाबी बाबा व काका यांच्यातील वाद मिटविण्याचीच प्रक्रिया मानली जात आहे.