शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019 राज्यातील सहकार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा डाव: शिवेंद्र्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:56 IST

सातारा : ‘केंद्र, राज्यातील सरकारच्या मनमानी धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य जनता सुखी नाही. या सरकारने नोटा बंदीचा निर्णय ...

सातारा : ‘केंद्र, राज्यातील सरकारच्या मनमानी धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, नोकरदार, सर्वसामान्य जनता सुखी नाही. या सरकारने नोटा बंदीचा निर्णय घेतला, त्यामुळे देशाचे अर्थकारण बदलले. सुरळीत चाललेल्या बँका अडचणीत येण्याची चिन्हे निर्माण झाली. सहकार क्षेत्र कोलमडून टाकण्याचा आणि अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला,’ असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.लिंबखिंड-पानमळेवाडी येथे आयोजित लिंब व शाहूपुरी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र्र सावंत, संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, प्रल्हाद चव्हाण, नंदाभाऊ जाधव उपस्थित होते.शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘जीएसटीसारख्या निर्णयामुळे वेगळाच पेच प्रसंग निर्माण झाला आहे. जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करणारे बांधकाम क्षेत्र रेराच्या अंबलबजावणीमुळे अडचणीत आले आहे. त्यामुळे सर्वांना त्रासदायक ठरणारे हे सरकार हटविण्याचा निर्धार या निवडणुकीत करू या.’खासदार उदयनराजे म्हणाले, ‘आपला बहुमोल वेळ वादावादीत वाया घालवू नका. कारण वेळ एकदा गेली की पुन्हा ती आणू शकत नाही. वेळ सत्कारणी लावण्यासाठी कायमस्वरुपी गैरसमज ठेवू नका. त्यातून आपणा सर्वांचाच तोटा होतो आणि नको त्यांचा फायदा होतो. गांधीजींनी देशाला लोकशाहीचा मंत्र दिला आणि पंचायत राज संकल्पनेतून सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्त्व सांगितले; मात्र जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात सध्या सत्तेच्या केंद्र्रीकरणाचा डाव रचला जात आहे. हा देश लोकशाहीतील राजांचा आहे की उद्योगपती अंबानी, अदानी अशा भांडवलदारांचा? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक गॅस, वायू, पाणी या राष्ट्रीय संपत्तीचे मालकी हक्क ठराविक उद्यागपतींना देऊन त्यांच्याकडून जनतेने ते विकत घेण्याची वेळ आली आहे.’यावेळी बाळासाहेब गोसावी, किरण साबळे-पाटील, धर्मराज घोरपडे, तात्या वाघमळे यांचीही भाषणे झाली. सभेस जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता चोरगे, पंचायत समितीच्या सदस्या सरिता इंदलकर, वसुंधरा ढाणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंद्र्रा जाधव, राजेंद्र लवंगरे, आनंदा नलवडे उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक