सातारा : शहर पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी महेश गजानन गोंदकर (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांना न्यायालयाने १ हजारांचा दंड, व दंड न दिल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, २८ जानेवारी २०१८ रोजी महेश गोंदकर यांच्या बहिणीचा अपघात झाला होता. त्या अनुषंगाने ते सातारा शहर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी तक्रार घेण्यास एवढा विलंब का केला, अशी विचारणा करत पोलिसांशी हुज्जत घातली होती. तुम्ही आमचे नोकर आहात आम्ही सांगेल तसे काम तुम्ही करायचे, असे मोठमोठ्याने बोलून हुज्जत घालून पोलीस कॉन्स्टेबल संतोष भिसे यांना धक्काबुक्की केली होती. त्यांना बाजूच्या खोलीत नेताना इतर अधिकाऱ्यांनाही त्यांनी बघून घेतो, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी महेश गोंदकर यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.हवालदार ए. आर. जगदाळे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब पाहून न्यायालयाने महेश गोंधकर यांना एक हजाराचा दंड ठोठावला. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा जाधव यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक अविनाश पवार, अंमलदार अजित फरांदे यांनी काम पाहिले.
सरकारी कामात अडथळा; साताऱ्यातील एकास दंडासह १ महिना साध्या कैदेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 4:47 PM