सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. यामध्ये युवा मतदान केंद्र, जय जवान, जय किसान, सखी, सक्षम, ‘ती’चे मतदान केंद्र अशी काही मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आकर्षक पध्दतीने ही मतदान केंद्रे सजविण्यात आल्याने मतदारांचे लक्ष वेधले जात आहे.‘७ मे - १०० टक्के मतदान’, रस्त्यावर रेखाटून संदेश ! सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून आता जिल्ह्यातील विविध रस्त्यावर ‘७ मे- १०० टक्के मतदान’ असा संदेश रेखाटण्यात आलेला आहे. यातून प्रशासनाने मतदारांत जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या अंतर्गत मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा यावेळी अधिक मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आवाहनही करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा स्वीप कक्षामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी (स्वीप कार्यक्रम) याशनी नागराजन यांनीही अनोखा उपक्रम राबविला. तसेच त्यांच्या संकल्पनेतून लोकांच्या दळणवळणाच्या मार्गावर ‘७ मे २०२४ - १०० टक्के मतदान ’ अशी वाक्ये लिहून मतदारांत जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, शहरी रस्ते, ग्रामीण रस्ते, रहदारीचे रस्ते तसेच गावांच्या प्रवशेव्दाराजवळ असा मजकूर रेखाटण्यात आलेला आहे.
सातारा जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे मतदारांना करतात आकर्षित..
By नितीन काळेल | Published: May 06, 2024 7:35 PM