कऱ्हाड : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा टंचाईच्या परिस्थितीत जयंती, उत्सव साजरे करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबविणे योग्यतेचे मानत येथील शिवसूर्या प्रतिष्ठानच्या युवकांनी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना पाण्याचे वाटप केले. येथील शिवसूर्या प्रतिष्ठानने शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता.. तालुक्यातील दुष्काळग्रस्त असलेल्या नांदगाव, पवारवाडी, साळशिरंबे, धनगरवाडी, विठ्ठलवाडी, तुळसण आदी गावांमध्ये ट्रॅक्टरद्वारे पाणी वाटप केले.समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. या भावनेतून प्रतिष्ठानने केलेल्या या पाणी वाटपामुळे ग्रामस्थांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामस्थांतून प्रतिष्ठानच्या या उपक्रमाबाबत कौतुकही करण्यात आले. प्रतिष्ठानकडून पाणी वाटपाच्या घेतलेल्या निर्णयाला नरेंद्र पाटील व नाथा पाटील यांनी आर्थिक साह्यही केले. प्रतिष्ठानचे शुभम पाटील, सूरज पाटील, किरण भोसले, मानसिंग चव्हाण, अविनाश येडगे, संकेत पाटील, आकाश पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दुष्काळी गावांना केले पाणी वाटप
By admin | Published: May 17, 2016 10:10 PM