तरडगाव : तरडगाव (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा व वेणूताई चव्हाण हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क ,सॅनिटायझर व ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार इयत्ता पाचवी पुढील वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थितीदेखील वाढत आहे तर गावात अधून-मधून एखादा कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. या पार्श्वभूमीवर शाळेत खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने अत्यावश्यक साधने शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आली.
सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते या साधनांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड, दीपक गायकवाड, संतोष कुंभार, हेमा गायकवाड, विद्या पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. (वा.प्र)
फोटो : १० तरडगाव
तरडगाव शाळेस ग्रामपंचायतीच्या वतीने सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जयश्री चव्हाण, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते. (सचिन गायकवाड)