शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

जिल्ह्यात २२५ अर्ज अवैध

By admin | Published: November 02, 2016 11:25 PM

नगरपालिका निवडणूक : आता धुमशान अर्ज माघारीचे

सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली असून, यात संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास २२५ अर्ज अवैध ठरविण्यात आले. सातारा पालिकेतील दोन उमेदवारांच्या अर्जावर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळण्यात आले असून, साताऱ्यात फक्त एक अर्ज अवैध ठरला. दरम्यान, छाननीनंतर बहुतांश उमेदवारांची धाकधूक संपली असून, आता अर्ज माघारीचे धुमशान सुरू होणार आहे. कऱ्हाड पालिकेत २१८ पैकी सहा अर्ज अवैध ठरले. मात्र, नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या चौदाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. फलटण नगरपालिकेच्या छाननीत ३२ नगरसेवक उमेदवारांचे, तर सहा नगराध्यक्षपदाचे अर्ज अवैध ठरले. रहिमतपूर नगरपालिकेसाठी ५९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. यापैकी थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण ४ अर्ज वैध, तर नगरसेवक पदासाठी ५१ अर्ज वैध ठरले. वाईत १२४ पैकी दोन अर्ज अवैध ठरले आहेत.महाबळेश्वर पालिकेत दोन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. पाचगणीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजय शंकर वन्ने यांचा अर्ज अवैध ठरला. नगरसेवकपदाच्या १७ जागांसाठी १३३ अर्जांपैकी पाच अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने ८१ उमेदवारांचे १२८ अर्ज उरले आहेत. म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी ९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर २१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात ७७ उमेदवारांचे ९१ अर्ज राहिले आहेत. दहिवडी नगरपंचायतीत १७ जागांसाठी ९२ उमेदवारांनी ११५ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १९ उमेदवारांचे ३३ अर्ज अपात्र ठरल्याने ८२ अर्ज शिल्लक असून, ७३ उमेदवार अद्यापही रिंगणात आहेत. वडूज नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी एकूण २०८ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १५४ अर्ज वैध तर ५४ अर्ज अवैध ठरले आहेत. कोरेगाव नगरपंचायतीत १७ जागांसाठी १०२ अर्जांपैकी ११ उमेदवारांचे १७ अर्ज छाननीमध्ये अवैध ठरविण्यात आले आहेत. छाननीनंतर ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. खंडाळा नगरपंचायतीत १०४ पैकी ४५ अर्ज पक्षाच्या वतीने भरलेले ए. बी. फॉर्म नसल्याने बाद ठरविण्यात आले. ज्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत फॉर्म प्रथम क्रमांकाने दिले गेले होते, त्यांचेच अर्ज वैध धरण्यात आले. मेढ्यात तिढा वाढला मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रेश्मा मुकणे या महिलेचा एकमेव अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल झाला होता. मात्र, हाही एकमेव अर्ज छाननीत नामंजूर झाल्याने सध्या तरी अनुसूचित जाती जमातीसाठी नगराध्यक्षपदाची खुर्ची रिकामीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, १७ प्रभागांसाठी आलेल्या ६८ उमेदवारी अर्जांपैकी सात अर्ज अवैध ठरले आहेत.