सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कच्च्या यादीवर ४६ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. या हरकतींवर बुधवारी कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
या हरकतींबाबत विभागीय सहनिबंधक कार्यालयाने संबंधित हरकत घेणारी व्यक्ती, संस्थांना नोटिसा धाडल्या होत्या. या नोटिसा मिळताच हरकतींवरील सुनावणीबाबत हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. २२ सप्टेंबरपर्यंत हरकतींबाबत निकाल जाहीर केला जाणार असून, २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मयत मतदाराचे नाव आल्याबाबत १९, यादीत नाव नसल्याबाबत ५, राजीनामा दिला असल्याने २, प्रतिनिधींच्या नावावर आक्षेपाच्या ११ तर नावात दुरुस्तीबाबत ११, निवडणूक झाल्याने ५ व नावात दुरुस्तीबाबत ४ अशा एकूण ४६ हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. गट क्र. १ साठी २७, गट क्रमांक २ साठी १, गट क्रमांक ३ साठी ७, गट क्र. ४ अ साठी ६, गट क्र. ४ ब साठी ५ अशा एकूण ४६ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.