शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

शेतीमाल गोदामासाठी जिल्हा बँकेची मदत

By admin | Published: August 28, 2016 12:04 AM

शिवेंद्रसिंहराजे भोसले : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेत घोषणा

सातारा : ‘शेतीमालाची शास्त्रीय साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी गोदामांचे निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाची ग्रामीण गोदाम योजना सुरू आहे. याकरिता जिल्हा बँकेतर्फे कर्जपुरवठा केला जात आहे. या योजनेअंतर्गत शासनाचे अनुदान तसेच बँकेच्या व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. विकास सेवा सोसायट्या, मार्केट कमिटी, खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने आदींनी या योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची ६६ वी वार्षिक सभा शनिवारी पार पडली. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष सुनील माने, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे, बँकेचे इतर संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे व अधिकारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘कार्यक्षम प्रशासन, उत्कृष्ट निधी व्यवस्थापन, पारदर्शक आणि सर्वसमावेशक कामकाज, भविष्यवेधी सकारात्मक धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे बँकेच्या उत्कर्षाचा आलेख कायम चढता ठेवला आहे. ‘लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड’समध्ये ‘सहकार क्षेत्रातील सर्वोच्च बँक’ म्हणून या बँकेची नोंद झाली आहे. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या संपूर्ण उत्कर्षासाठी जिल्हा बँक कटिबद्ध आहे. तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्याच्या परिपूर्तीसाठी संचालक मंडळ योग्य निर्णय घेत आहे. जिल्हा बँक कृषी कर्जावर भर देत आहे. आता वैयक्तिक कर्जावर भर देणे आवश्यक बनले आहे. स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांच्या भल्याचे निर्णय आम्ही घेत आहोत.’ दरम्यान, यावेळी सोसायटी सक्षमीकरणाचा ठराव करण्यात आला. सभासद पातळीवर कर्ज वसुलीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोसायट्यांचा गौरव करण्यात आला. खोडत (ता. सातारा), पोतले (कऱ्हाड), अलगुडेवाडी (ता. फलटण), नहरवाडी (कोरेगाव), भुरकवडी (ता. खटाव), वाठार बुद्रुक (ता. खंडाळा), सोनगिरवाडी (ता. वाई), दाडोली (ता. पाटण), इंदवली (ता. जावळी), पांगरी (ता. माण), मेतगुताड (ता. महाबळेश्वर) या सोसायट्यांचा यात समावेश आहे. जनाबाई जुनगरे, यशोदा हरी पवार (पाल), साधना पोपट फडतरे (वाकेश्वर), मंगल शहाजी आटपाडकर (वरकुटे), कमल हणमंत चतूर (धुमाळवाडी) यांना अपघात विम्याचा लाभ देण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. सभासदांचे सुनील माने यांनी स्वागत केले. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी अहवाल वाचन केले. राजेंद्र राजपुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) सभासदांची लक्षणीय उपस्थिती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेला सभासदांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. सभागृह खचाखच भरले होते. तर सभागृहाबाहेरही सभासद उभे राहून भाषणे ऐकत होते. या लक्षणीय उपस्थितीचा उल्लेख रामराजेंनी आपल्या भाषणात केला.