लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती प्रकिया ही चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याची गंभीर बाब निकालानंतर समोर आली आहे. या बोगस भरती प्रकरणी लवकरच नायबर कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे,’ अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. देसाई म्हणाले, ‘ परीक्षा झाल्याानंतर कंपनीने ६ जूनला वेबसाईटवर उत्तीर्ण झालेल्या मुलांचे बैठक क्रमांक दर्शविले होते. संबंधित कंपनीने १३ जून २०१७ रोजी वेबसाईटवर अंतिम यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये लिपीक या पदासाठी बैठक क्र. ८१२६२, ८४९६०, ८३६६८, ८४३५९, ८५९९६, ८६०९०, ८६७७४, ८६८३६, ८६८६२, ८६९३३, ८८०५८ हे सर्व लिपिक पदाचे नंबर असून हे सर्व नंबर दि. ६ जून रोजी जाहीर झालेल्या यादीमध्ये नसतानाही अंतीम १३ रोजीच्या यादीत पास म्हणून दर्शविण्यात आले आहेत. तसेच शिपाई पदाचे बैठक क्र. १८९१, २३२५, २७८४, ४०६८, ६५७७, ९१९६ हे नंबरही गैरव्यवहार करून उत्तीर्ण करण्यात आल्याचा आरोपही यावेळी देसाई यांनी केला. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती प्रक्रिया ही पारदर्शी नाही. निकालाचे गुण अद्यापर्यंत दर्शविण्यात आलेले नाहीत. फक्त वेबसाईटवर उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक दर्शविण्यात आले असून हे पूर्णपणे भरती मॅनेज प्रक्रियेनुसार करण्यात आल्याचा आरोपही देसाई यांनी यावेळी केला. नायबर कंपनीने भरती प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविली आहे. या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन मागणी केली आहे. सहकारमंत्र्यांनी सहकार आयुक्तांना पुढील कारवाईचे आदेश दिल्याचेही देसाई यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देसार्इंनी केलेले आरोप...भरती परीक्षेमध्ये लिहिलेल्या व तपासलेल्या पेपरची छायांकित प्रत विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार परीक्षा पारदर्शी झाली आहे की नाही हे दाखविले जाते. परंतु येथे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट काढून घेण्यात आले. हे पूर्णपणे चुकीचे आहे. माण तालुक्यातील बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शी नाही. निकालाचे गुण अद्यापर्यंत दर्शविण्यात आलेले नाहीत. फक्त वेबसाईटवर उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक दर्शविण्यात आले असून ही पूर्णपणे भरती मॅनेज प्रक्रियेनुसार करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची मेरीट लिस्ट दर्शविण्यात आलेली नाही. उत्तीर्ण झालेल्या सहा विद्यार्थ्यांची पहिल्या यादीतील शंभरमध्ये नावे आहेत. ही सर्व मुले मेरीटमध्ये असतानाही त्यांना अनुत्तीर्ण केले आहे.
नापासांनाही जिल्हा बँकेची नोकरी !
By admin | Published: June 15, 2017 10:41 PM